How To Fries Bhajiya With Bare Hands: भजी खायला कोणाला आवडतं नाही. प्रत्येक घरात भजी आवडीने खाल्ले जातात. कित्येक जण आवडीने भजी खातात तर कित्येक लोकांसाठी हे त्यांचे दिवसभरातील एकमेव जेवण असते. कित्येक लोक ऑनलाईन भजी ऑर्डर करतात पण जी मजा रस्त्यावरील विक्रेत्यांकडे जाऊन गरमा गरम भजी खाण्यात आहे ती मजा दुसऱ्या कशातच नाही असे अनेक खाद्यप्रेमींना वाटते.

भजी बनवणे तसे सोपे काम आहे. कांदा किंवा बटाटा , किसून किंवा चिरून घ्यायचा. बेसनाचे पीठ भिजवून सरसरीत करून घ्यायचे आणि चिरलेला कांदा किंवा बटाटा त्यात बुडूवून गरम तेलात सोडायचे आणि भजी तळून घ्यायचे. पण गरम तेलात भजी टाकणे आणि तळून काढणे हे तसे जोखमीचे काम असते कारण थोडासा निष्काळजीपणा झाला तरी आपल्या गरम तेलामुळे भाजू शकते. भजी किंवा कोणताही पदार्थ गरम तेलात तळताना भाजणार नाही याची काळजी घेतो पण तुम्हाला जर आम्ही असे सांगितले की एक असा व्यक्ती आहे जो चक्क गरमागरम तेलात हात टाकून भजी तळतो तर…..? हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना पण हे खरचं सत्य आहे. सोशल मीडियावर एका विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा- आईच्या दुचाकीवरून पडले अन् कारखाली अडकले लहान मुलं! अनोळखी लोक आले मदतीला धावून, ‘असा’ वाचवला लेकराचा जीव

हेही वाचा – टायरवर चढवले टायर, जुगाड करून तयार केली चारचाकी बाइक; Viral Video पाहून लोकांनी उडवली खिल्ली

व्हायरल व्हिडीओमध्ये सुरतमधील एक विक्रेता भजी तयार करताना दिसत आहे. तो बेसनमध्ये काही भाज्या आणि पाणी टाकून पीठ तयार करतो मग, काळजीपूर्वक तेलांत टाकण्या आधी आपल्या हातांनी भज्यांना आकार देतो आणि पुढच्या क्षणी तो गरम तेलात हात टाकतो. हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो आहे . हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर foodie_addicted_ आणि rajaironman75 या अकांउटवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडी ओपाहून लोक थक्क झाले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. इंडियाज गॉट टॅलेंट – सुरतचा भजीवाला. एक फाररप्रुफ व्यक्ती दाभोलीच्या (Dabholi) सुप्रसिद्ध कुंभनिया भजी ( (Kumbhaniya Bhaji) गरम तेलात फायरप्रुफ हातांनी बनवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने विक्री करत आहे”