गेल्या आठवडाभरापासून अजगराचा एक व्हिडिओ व्हॉट्स अॅप, फेसबुकवर तुफान वेगानं व्हायरल होत आहे. स्टेशनवर जवळपास १५ फूटांचा अजगर दिसल्यानं प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण व्हिडिओमधून दिसून येत आहे. मुंबईमधल्या दादर स्थानकावरचा हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातं आहे, पण ही निव्वळ अफवा असून तो व्हिडिओ जम्मू-काश्मीरमधला असल्याचे समोर आले आहे.
जम्मू-काश्मिरमधल्या कटरा स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे. वैष्णोदेवी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी तो चित्रित केल्याचे ‘एनडीटीव्ही’ने म्हटले आहे. हा व्हिडिओ गेल्या महिन्यातला असून, कटरा स्टेशनवर काही भाविक उभे असताना त्यांना छप्परावरून मोठा अजगर खाली येताना दिसला होता. अजगराला पाहताच प्रवाशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, ताबडतोब वनविभाग आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. स्थानिकांच्या मदतीनं या अजगराला पकडून जंगलात सोडण्यात आलं.
८० वर्षांच्या मुलाची काळजी घेण्यासाठी ९८ वर्षांची आई राहू लागली वृद्धाश्रमात
जम्मूमधील बाणगंगा भागात हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे, त्यामुळे दादर स्थानकामधला हा व्हिडिओ नाही. अनेकांनी कोणतीही शहानिशा न करता ही व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर फॉरवर्ड केली, त्यामुळे आणखी गोंधळ उडाला.