scorecardresearch

‘या’ आजोबांची चूर्ण विकायची ही हटके पध्दत होतेय Viral; अनुराग ठाकूर यांनी शेअर केला Video

आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. चूर्ण विकताना ते वृद्ध निवडणुकीच्या कविता गाताना दिसतात.

old age selling churna
व्हायरल व्हिडीओ (@ianuragthakur / Twitter)

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असताना सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर चूर्ण विकताना दिसत आहे, मात्र त्यांनी ते विकण्यासाठी अवलंबलेली पद्धत लोकांना पसंत केली जात आहे. चूर्ण विकताना ते वृद्ध निवडणुकीच्या कविता गाताना दिसतात, जे ऐकण्यासाठी लोक आवर्जून येत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने लोकांची मने जिंकली आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

नक्की काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत दावा केला जात आहे की तो उत्तर प्रदेशचा आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती हातात टोपली घेऊन दिलखुश नावाचे चूर्ण विकताना दिसत आहे. ते एक राजकीय कविता देखील वाचत आहे, ज्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे कौतुक करताना दिसत आहे आणि ग्राहकांसाठी कागदाच्या तुकड्यांवर चूर्ण ठेवत आहे. इतकंच नाही तर तिथे उपस्थित लोक या कवितेचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

(हे ही वाचा: जगातील सर्वात बलवान मूल, ज्याने आपल्या कारनाम्यांनी लोकांना केलं थक्क; पण आता…)

(हे ही वाचा: एलियन होण्यासाठी केल्या १०० हून अधिक शस्त्रक्रिया; केले लाखो रुपये खर्च)

व्हिडीओ शेअर करताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिहिले की, “उत्तर प्रदेशच्या या सज्जनाचं केवळ चूर्ण दिलखुश नाही तर त्यांची कविता तुमच्या हृदयात उतरेल.” आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This weird way of selling old age churna is viral video shared by anurag thakur ttg

ताज्या बातम्या