अनेकदा दिव्यांग लोकांना शारीरिक अपंगत्वामुळे नोकरी नाकारली जाण्याच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते. यापैकी काहीजण सोशल मीडियावर आपले हे अनुभव शेअर करतात.

Viral : जायचं होतं थीम पार्कमध्ये पण पोहोचले उकिरड्यात

शॅनी डॅड्या नावाच्या तरूणीला अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. शॅनीची उंची फक्त ३ फूट १० इंच इतकी आहे. त्यामुळे तिला इतरांसोबत वावरताना त्रास व्हायचा. यावरून अनेकजण तिची मस्करीही करत. वयाच्या १६ व्या वर्षांपासून ती नोकरीच्या शोधात होती. पण कमी उंची आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे कारण सांगून तिला अनेकदा नोकरी नाकारली गेली. मात्र, इतक्या वेळा अपयश आल्यानंतर शॅनीने आपल्या नोकरीच्या अर्जात काही बदल केले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर शॅनीला लगेचच नोकरी मिळाली. यानंतर दिलेल्या मुलाखतीत शॅनीने म्हटले की, तब्बल १०० वेळा मला नोकरी नाकारण्यात आली होती. त्यामुळे मी नोकरीच्या अर्जात आपल्या व्यंगाबद्दलचा उल्लेख टाळण्याचे ठरवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Viral Video : तिच्या भन्नाट डान्समुळे ‘जुडवा २’ गाणं पुन्हा आलं चर्चेत

आपण स्वत:मधल्या कमतरता जगासमोर मांडल्या की जगही तुम्हाला दुबळं समजू लागतं. त्यामुळेच मी स्वत: कोणतंही काम करण्यासाठी सक्षम असल्याचे जगाला पटवून दिलं आणि याच आत्मविश्वासामुळे मला एका चांगल्या कंपनीत नोकरीही मिळाली, असे शॅनीने सांगितले.