लठ्ठपणाचा शिकार झालेले अनेक लोक तुम्ही पाहिले असतील, पण नुकताच जगातील सगळ्यात लठ्ठ अशा महिलेचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या महिलेचे वजन तब्बल ५०० किलो म्हणजे अर्धा टन असल्याचे नोंदवण्यात आले आहे. इजिप्तमधल्या अलेक्झॅड्रीयामध्ये राहणारी ३६ वर्षीय इमान ही जगातील सगळ्यात लठ्ठ महिला आहे. इमान अहमद अब्लदुलाती ही ३६ वर्षीय महिला गेल्या २५ वर्षांपासून घरातून बाहेरच पडली नाही. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे वजन इतके अधिक आहे की तिला बिछान्यावरुन हलताही येत नाही. आपल्या दैनंदिन क्रियेसाठी इमानही पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयापेक्षा अधिक होते. जन्माच्यावेळीच तिचे वजन जवळपास ५ किलोच्या आसपास होते. इमान ही ११ वर्षांची झाली तेव्हा तिच्या वजनामुळे तिला नीट उभे राहता यायचे नाही. त्यामुळे खेळण्या बाडगण्याच्या वयात इमानला घरातच राहावे लागायचे. त्यातूनच अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला शाळाही सोडावी लागली. गेल्या २५ वर्षांपासून तिची आई आणि बहिण तिची सेवा करत आहे. इमान पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसीकडे वैद्यकिय साहाय्य मागितले आहे. यासाठी त्यांनी ऑनलाइन याचिका देखील दाखल केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2016 रोजी प्रकाशित
Viral : ‘ही’ आहे जगातील ‘वजनदार’ महिला
तिचे वजन ५०० किलो आहे
Written by वृत्तसंस्था

First published on: 24-10-2016 at 17:15 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This woman is fattest in the world