‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी नोटांबदीचा निर्णय जाहिर करुन देशाचे हित साधले आहे आणि त्यांच्याविरुद्ध बोलणा-या माझ्या नव-यालाही काडीमोड द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही’ असे ओरडून सांगणा-या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतो आहे.

VIDEO : ‘राहुल गांधींनी मला स्वप्नात येऊन लग्नाचे वचन दिले’

देशातील काळा पैसा आणि बनवाट नोटांना चाप बसावा यासाठी मोदींनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयाला तीन आठवडे उलटूनही बँका आणि एटीएमच्या बाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे या निर्णयाचे समर्थन करणारे तर दुसरीकडे या निर्णयाविरोधात आवाज उठवणारे असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे, मोदींनीही जनमत चाचणी घेऊन जनतेचे या निर्णयावर मत मागवले होते. यात ९० टक्के जनतेने मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा दिला होता. या ९० टक्क्यांमधली रश्मी जैन ही एक महिला आहे.

‘माझा नवरा अँटी मोदी आहे. म्हणूनच, मी त्याला काडीमोड देण्यासाठी मागे पुढे बघणार नाही’ असे ही महिला भर रस्त्यात ओरडून सांगत होती. ‘मोदी हे देशाच्या हितासाठी लढत आहेत. यासाठी सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. देशामध्ये बँकेच्या बाहेर जी रांग लागली आहे त्याला बँकेमधल्या काही कर्मचा-यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे’ असे देखील ती ओरडून सांगत होती. त्यामुळे मोदींसाठी नव-यालाही काडीमोड देणा-या या मोदी भक्ताची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे.