चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना एका अनोख्या घटनेचं दर्शन घडलं. सामान्यपणे वाघ बघण्याच्या हेतूने या व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या काही पर्यटकांना त्यांच्या डोळ्यासमोरच वाघ आणि अस्वलामधील संघर्ष पहायला मिळाला.

झालं असं की वाघाने अस्वलाचा रस्ता रोखला. त्यानंतर संतापलेल्या अस्वलाने टी १९ वाघ बछड्याचा पाठलाग केला. अस्वलाचा रुद्रावतार पाहून वाघने जंगलात ठोकली धूम. एरवी जंगलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलापुढे माघार घ्यावी लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.