World Sparrow Day: चिऊताई, चिऊताई दार उघड ! दार असं लावून, जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील ? आपलं मन आपणच खात बसशील ?. कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठी आहे. आता तुम्ही म्हणाल आज ही कविता का? तर त्याला कारणही तसंच आहे. आज जागतिक चिमणी दिन आहे. आज 20 मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन 2010 मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. मात्र गाव-शिवारातून चिमण्या कमी होत चालल्या आहेत. शहरात चिमणी शोधावी लागते. पुढे मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिमण्या कमी होण्याची कारणे?

पूर्वी अंगणात धान्य वाळू घातले जायचे. शेतीत असणाऱ्या खळ्यातूनही त्यांना अन्न मिळत असे. मात्र आता वाळू घातलेल्या धान्यावर असणाऱ्या किटकनाशक पावडरमुळे चिमण्यांना प्रजननात अडचणी येत आहेत. पूर्वीच्या काळी असलेल्या जुन्या घरांमध्ये कौलारु घरांमुळे चिमणीला आपले घरटे बांधण्यासाठी जागा असायची, ती अगदी सहज माणसाच्या घरात ये-जा करु शकत असे. मात्र आता चकचकीत घरांमध्ये, स्लाईडिंगच्या खिडक्यांमधून चिमणीताईला घरात येण्यासाठी रस्ता हरवला आहे. मोबाईल टॉवर्सचे रेडिएशन्स, हानिकारक किरणे यामुळेही कित्येक चिमण्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – चिंपांझीचं मातृप्रेम: आधी वाटलं बाळाचा मृत्यू; मात्र पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यात येतील अश्रू

चिऊ ताईला वाचविण्यासाठी हे करु शकतो-

उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे. पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे. आता बागेतील चिमणी गायब होण्यासाठी वाचवायची असेल तर आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी चिऊ वाचवू अभियान राबवू या असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is world sparrow day find out when the first world sparrow day was srk
First published on: 20-03-2023 at 13:03 IST