scorecardresearch

गर्लफ्रेंडने दिला धोका, तरुणाला मिळाले हार्टब्रेक इन्शुरन्सचे पैसे; नेटकरी म्हणाले “स्कीम सुरु आहे का?”

गर्लफ्रेंडने धोका दिल्यामुळे हार्टब्रेक इन्शुरन्स फंडातील पैसे मिळाले.

girlfriend business idea
सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या ब्रेकअप स्टोरीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या ब्रेकअप स्टोरीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे ज्या तरुणाची ब्रेकअप स्टोरी व्हायरल होत आहे, त्याने स्वत:च ट्विट करत सर्वांना त्याबाबतची माहिती दिली आहे. शिवाय गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करुन आपणाला २५ हजार रुपये मिळाल्याचा दावा देखील त्याने केला आहे. या तरुणाचे म्हणणे आहे की, गर्लफ्रेंडने माझी फसवणूक केली, त्यामुळे मला ‘हार्टब्रेक इन्शुरन्स फंड’ अंतर्गत ही रक्कम मिळाली.

या घटनेतील तरुणाचे नाव आर्यन असं असून त्याने ट्विटद्वारे सांगितलं की, जेव्हा आमच्या नात्यात ब्रेकअप सारखी परिस्थिती जाणवायला लागली तेव्हा मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला ‘हार्टब्रेक इन्शुरन्स फंड’ची कल्पना सुचली. त्यानुसार दोघांनीही महिन्याला ५०० रुपये जॉइंट अकाउंटमध्ये जमा करायचे ठरवलं. शिवाय ज्याला पहिल्यांदा धोका दिला जाईल त्याला हे सर्व पैसे मिळतील, असं आम्ही ठरवलं.

हेही पाहा- Video: विचित्र स्टंट करत पळवली स्कूटी, काही क्षणात मिळाली शिक्षा; रिक्षाला ओव्हरटेक करायला गेला अन्…

शिवाय त्याने ट्विटमध्येच सांगितलं की, त्याच्या गर्लफ्रेंडने २ वर्षांनी त्याला धोका दिला त्यामुळे त्याला ‘हार्टब्रेक इन्शुरन्स फंड’मधील २५ हजार रुपये मिळाले. प्रतीकचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लोकांनी वाचलं आहे. तर नेटकरी त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

हेही पाहा- मामा असावा तर असा…! भाचीला लग्नात दिल्या ३ कोटींच्या भेटवस्तू, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल

मैत्रिणीने माझी फसवणूक केल्याने २५ हजार मिळाले –

प्रतीकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मला २५ हजार रुपये मिळाले कारण माझ्या गर्लफ्रेंडने माझी फसवणूक केली. जेव्हा आमची रिलेशनशीप सुरू झाले तेव्हा आम्ही प्रत्येक महिन्याला ५०० रुपये एका संयुक्त खात्यात जमा करायचो. शिवाय आम्ही एक नियम केला होता, तो म्हणजे दोघांपैकी पहिल्यांदा ज्याच्यासोबत धोका होईल त्याला सर्व पैसे मिळतील.

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस –

प्रतीकच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत, एकाने लिहिले आहे की, चांगली कल्पना आहे सर, तर आणखी एकाने, “अशी बिझनेस आयडिया रिलेशनशिपमध्ये पहिल्यांदाच पाहिली”, असं म्हचलं आहे. शिवाय दुसऱ्या एका व्यक्तीने या पैशांचे काय करणार? असा प्रश्न विचारला आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी तर ही स्कीम सुरु आहे का? असा प्रश्नही विचारला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 18:39 IST