समुद्राच्या पृष्ठभागावर टायटॅनिक जहाज दाखवणारे दुर्मिळ व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जहाज हिमखंडावर आदळून बुडाल्यानंतर शंभाराहून अधिक वर्षांनंतर हे फुटेज प्रसिद्ध करण्यात आले आहे. १९१२ साली समुद्रात बुडालेले टायटॅनिक जहाज हे अनेकदा चर्चेचा विषय बनले आहे. शिवाय जॅक आणि रोझच्या प्रेमकथेमुळे लोकप्रिय ठरलेल्या टायटॅनिक चित्रपटामुळे तर टायटॅनिक हे जहाज लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या लक्षात आहे.

समुद्रात बुडण्याच्या काही दिवस आधी हे जहाज इंग्लंडहून अमेरिकेला रवाना झाले होते. दिसायला अतिशय प्रेक्षणीय असलेले हे सुंदर जहाज शंभराहून अधिक वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते. त्याची काही व्हिडीओ फुटेज आणि फोटो आता प्रसिद्ध करण्यात आले आहेत. शिवाय अनेकांना ते पाहण्याची उत्सुकता लागली आहे. वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशन (WHOI)ने टायटॅनिकचे फुटेज प्रसिद्ध केले आहेत.

हेही पाहा- “ट्विटर वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस” एलॉन मस्कने शेअर केलेला सेक्सी फोटो पाहून नेटकरी संतापले

रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे फुटेज समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३ किलोमीटर खाली शूट करण्यात आले होते. तर १ सप्टेंबर १९८५ मध्ये डब्लूएचओआय आणि फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांना कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या आग्नेयेला दोन तुकड्यांमध्ये बुडालेले जहाज सापडले होते.

टायटॅनिकच्या अवशेषांचे दुर्मिळ फुटेज –

हेही पाहा- दिड वर्षाचा चिमुकला वाशिंग मशीनमध्ये पडला, १५ मिनिटांनी बाहेर काढलं पण साबणाच्या पाण्यामुळे…

मात्र, आतापर्यंत या जहाजाची सर्व फुटेज सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेली नाहीत. त्याचा शोध लागल्यापासून, टायटॅनिकबद्दलच्या अनेक माहितीपटांमध्ये त्याचे काही फुटेज दाखवण्यात आले आहेत. तसंच त्याच्या मूळ डायव्हच्या काही क्लिपदेखील प्रसारित करण्यात आल्या आहेत. परंतु बुधवारी YouTube वर आजपर्यंत कोणीही न पाहिलेल्या फुटेजचा ८० मिनिटांचा मोठा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायटॅनिक, जेव्हा ते बांधले गेले तेव्हा जवळजवळ अभेद्य मानले गेले होते, त्यावेळी सेवेत असणारे ते सर्वात मोठे सागरी जहाज होते. १४ एप्रिल रोजी साउथॅम्प्टन, इंग्लंड येथून न्यूयॉर्कपर्यंतचा पहिला प्रवास करताना ते हिमखंडावर आदळले. या दुर्घटनेत १,५०० हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन याच्या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या “टायटॅनिक” चित्रपटाच्या २५ व्या अॅनिवर्सरीनिमित्त हे फुटेज प्रदर्शीत करण्यात आली आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रासह ११ अकादमी पुरस्कार जिंकले आहेत.