आजकाल कोणताही वस्तू सहज ऑनलाईन ऑर्डर करता येते. एका क्लिकवर डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेले सर्व सामान घेऊन दरात उभा असतो. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीही ऑनलाईन ऑर्डर करण्याची अनेकांना सवय झाली आहे.अनेकदा ऑनलाईन ऑर्डरचे मजेदार व्हिडीओ, फोटो जगभरातून समोर येत असतात. अशात पाकिस्तानमधून आता फोटो समोर आला आहे, जो पाहून तुम्ही देखील म्हणाल, काय खुळ्यांचा बाजार आहे. या फोटोमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन केक ऑर्डर केला आणि त्याचवेळी डिलिव्हरी बॉयला येताना २ हजार रुपयांचे सुट्टे पैसे आणण्याची मागणी केली. या मागणीला बेकरी मालकाने अशी काय दाद दिली जी पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
नेमकं काय घडलं?
एक व्यक्तीने पाकिस्तानमधील एका बेकरी शॉपमधून ऑनलाईन केक ऑर्डर केला होता. यावेळी बेकरी मालकाला त्याने डिलिव्हरीच्या वेळी २००० रुपयांचे सुट्टे पैसे आणण्याची मागणी केली. त्याने उर्दूमध्ये ही मागणी केली होती. मात्र केकची ऑर्डर घेऊन जेव्हा डिलिव्हर बॉय त्या व्यक्तीच्या घरी आला, तेव्हा त्याने डिलिव्हरी बॉयला २००० रुपये सुट्टे आणलेस का अशी विचारणा केली, तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयने नाही असे सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने केकचा बॉक्स उघडला तेव्हा तोही काहीवेळ शांतचं झाला. कारण बेकरी मालकाने केकवरचं चक्क त्याने त्या व्यक्तीची २००० रुपये सुट्टे आणण्याची मागणी क्रिमने लिहिली होती. ‘ब्रिंग चेंज ऑफ 2000’ असं त्या बेकरी मालकाने केकवर इंग्रजीत लिहिलं होतं.
ट्रेन चालवताना रूळ अंगावर येतो वाटतं अन्…मोटारमॅनच्या केबिनमधला ‘हा’ Video पाहून एलॉन मस्क थक्क
पाकिस्तानी ट्विटर यूजर जावेद शमीने या घटनेचा एक फोटो ट्विटवर शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, एक लेअर केक ऑर्डर केल्यानंतर मी २००० रुपये सुट्टे आणण्याची मागणी केला होती. यानंतर काय डिलिव्हरी आली पाहा…. बेकरी मालकाच्या या मजेशीर कलाकारीवर आता हसावी की रडावं असा प्रश्न पडला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीने हा केक लाहोरमधील एका आउटलेटवरून ऑर्डर केला होता, परंतु त्यालाही माहीत नव्हते की, त्याच्यासोबत असा मोठा प्रँक होणार आहे.
सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून युजर्स त्या व्यक्तीची चांगलीच मजा घेत आहेत. आत्तापर्यंत हा फोटो ५६४.९ हजार लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याची इमेजी शेअर केली आहे.