ब्रेन गेम हे नेहमीच बुद्धीला चालना देणारे असतात पण त्याचबरोबर या खेळाची गंमत म्हणजे अशी की एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वेगळी दृष्टी हे खेळ देतात. म्हणूनच सोशल मीडियावर अशा खेळांना खूपच पसंती मिळते. अनेक जण आवर्जुन ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा असेच एक कोडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पहिल्या फटक्यात फक्त आठपैकी एक जण सोडवू शकतो असा दावा करण्यात आला आहे, त्यामुळे तर हे कोडे सोडवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : या व्हायरल फोटोचे कोडे सुटता सुटेना

प्लेबझवर एक चित्र अपलोड करण्यात आले आहे. एका झाडाखाली बदकांचा थवा जमला आहे. नदीच्या किनारी झाडाखाली बदकांचा थवा आराम करत आहे आणि याच झाडावर एक कोल्हा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला आहे. आता या ठिकाणी कोल्हा कुठे लपून बसला आहे याचे उत्तर एक फटक्याच शोधायचे आहे. विशेष म्हणजे या कोड्याचे उत्तर सोडवण्यास ८ पैकी ७ व्यक्तींना हमखास अपयश येते. आता तुम्हीही  यात लपलेला कोल्हा शोधण्याचा प्रयत्न करून पाहू शकता. जर पहिल्या प्रयत्नात  यश  नाहीच आले तर याचे उत्तर सोबत दिलेच आहे.

video : या वर्तुळात काही वेगळे दिसले का?

वाचा : चीनमध्ये ‘रोबोट’ झाला रिपोर्टर

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tricky optical illusion of geese and fox goes viral on social media
First published on: 23-01-2017 at 18:17 IST