जगभरात विविध प्रकारचे मासे आहेत हे आपल्याला माहितीये. पण सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या माशाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या माशाला चक्क माणसाप्रमाणे ओठ आणि दात असल्याचं दिसतंय. त्यामुळे हे फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या माशाचा फोटो पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या विचित्र माशाचा फोटो मलेशियामधला असल्याचं समोर आलं आहे. हा विचित्र मासा म्हणजे मलेशियामध्ये आढळणारा ‘ट्रिगरफिश’ (Triggerfish) मासा असल्याचं सांगितलं जात आहे. या माशाचे ओठ आणि दात दिसायला अगदी माणासासारखे आहेत. त्यामुळे या माशाचा फोटो तुफान व्हायरल होतोय.
bibir dia lagi seksi dari aku pic.twitter.com/zzq8IPWzvD
— RaffNasir• (@raff_nasir) July 2, 2020
खरंच माणासासारखा असा कोणता मासा असतो का? असा प्रश्न अनेक नेटकरी विचारतायेत. तर हा फोटो खोटा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, Triggerfish मासे सामान्यपणे दक्षिण-पूर्व आशियातील समुद्रामध्ये आढळतात अशी माहिती आहे.