डोनाल्ड ट्रम्प सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी चीनच्या माध्यमात डोनाल्ड ट्रम्प यांची नात अॅराबेलाची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळत आहे. छोट्या अॅराबेलानं आपल्या कौशल्यानं चिनी नागरिकच काय पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नीलाही प्रभावित केले आहे. चीन दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नीला आपल्या नातीचा एक व्हिडिओ दाखवला. अॅराबेलानं खास शी जिनपिंग आणि चिनी जनतेसाठी मँडरिन भाषेत गाणं गायलं. एवढ्या छोट्या मुलीचं मँडरिन भाषेवरील प्रभुत्त्व पाहून शी जिनपिंग खूपच प्रभावित झाले. अॅराबेला फक्त सहा वर्षांची आहे, ती इव्हांकाची मुलगी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2017 रोजी प्रकाशित
Viral Video : डोनाल्ड ट्रम्पच्या नातीचे मँडरिन ऐकून चीनचे राष्ट्रध्यक्षही प्रभावित झाले
ती फक्त ६ वर्षांची आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 10-11-2017 at 11:44 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump granddaughter impresses chinese president xi his wife with mandarine