सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसाच त्याचा तोटादेखील आहे. कारण अनेकदा सोशल मीडियावर खोट्या गोष्टीही वाऱ्याच्या वेगानं पसरतात. या माध्यमाची व्याप्ती खूप मोठी असल्यानं एखादी गोष्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा न करता ती तशीच फॉरवर्ड करण्याची मानसिकता हळूहळू वाढत चालली आहे. याचीच प्रचिती आली पंजाबमध्ये. पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर अल्पावधीच व्हायरल होऊ लागला. ही सुंदर तरूणी पंजाब पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगून तो फोटो व्हायरल झाला. अर्थात इतक्या सुंदर पोलीस अधिकाऱ्याच्या चर्चेला सुरूवात झाली, लोकांनी तिच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणून केट मिडलटनच्या गळ्यातील हार ठरला लक्षवेधक

Video : छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंडिगोच्या एअरहॉस्टेसनं घेतली ‘शाळा’

पण नंतर मात्र लोकांना आपण केलेली गल्लत लक्षात आली. हा फोटो खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो एका अभिनेत्रीचा आहे हे समजल्यावर लोकांना मात्र हसावं की रडावं असं झालं होतं. या अभिनेत्रीचं नाव कयामत अरोरा असून ती सध्या एका पंजाबी चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात ती हर्लिन मान नावाच्या महिला पोलिसाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कदाचित लोकांचा अधिक गोंधळ उडाला असण्याची शक्यता आहे. पण काहीही असलं तरी ती सध्या ऑनलाइन सेन्सेशन ठरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truth behind the viral photo of punjab police officer harleen mann
First published on: 22-11-2017 at 11:00 IST