लग्नाचे दिवस हे मंतरलेले असतात. कुठल्याही जोडप्यासाठी हा आनंदाचा काळ असतो. दोघांनीही आपल्या जोडीदाराबरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवलेली असतात. आयुष्यातले हे दिवस कधी संपूच नयेत अशी भावना असते. पण या सुंदर दिवसांमध्ये जोडीदारानेच फसवणूक केली तर? सर्व स्वप्नाचा चुराडा होता. घरातील आनंदाचे वातावरण दु:खामध्ये बदलते.

काय घडलं?
युगांडामध्ये राहणाऱ्या एका इमामाच्या बाबतीत असा प्रकार घडला. मुलगी समजून जिच्या बरोबर लग्न केले तो पुरुष असल्याचे समजल्यानंतर त्याला जबर मानसिक धक्का बसला. दोन आठवडयांपूर्वी मोहम्मद मुतुंबा यांचा पारंपारिक पद्धतीने एका तरुणी बरोबर निकाह झाला.

शरीरसंबंध का प्रस्थापित झाले नाहीत?

लग्नानंतर भावनिक नाते जितके गरजेचे असते, तितकेच शरीरसंबंध सुद्धा महत्वाचे असतात. शरीरसंबंध सुद्धा प्रेमाचा एक भाग असतो. पण मोहम्मद आणि त्याच्या पत्नीमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले नाहीत. डेली नेशनच्या वृत्तानुसार त्यांच्या पत्नीने मासिक पाळीचे कारण देऊन शरीरसंबंध टाळले.

महिला स्त्री नसून पुरुष असल्याचं शेजाऱ्याला कसं कळलं?
या प्रकरणात इमामाऐवजी त्याच्या शेजाऱ्यानेच इमामाची पत्नी स्त्री नसून पुरुष असल्याचे शोधून काढले. आपल्या घरातील वस्तू चोरण्यासाठी इमामाच्या पत्नीने भिंतीवरुन उडी मारल्याचा आरोप शेजाऱ्याने केला. शेजाऱ्याने पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमाम आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बोलावले. पोलीस ठाण्यात येताना इमामाच्या पत्नीने मुस्लिम स्त्रियांसाठीची पारंपारिक वेशभूषा केली होती. इमामाच्या पत्नीला तुरुंगात टाकण्याआधी तिची तपासणी करताना महिला पोलीस अधिकारी चक्रावून गेली. महिला असल्याचे भासवण्याचे प्रयत्न करणारी इमामाची पत्नी पुरुष असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी सुरु करताच पैशांसाठी स्त्री बनून इमामाची फसवणूक केल्याचे आरोपीने मान्य केले.