युक्रेनच्या एका महिलेने असं काही केलंय की ज्यामुळे सगळेच हैराण झालेत. विमानाच्या आतमध्ये या महिलेला गरम होत होतं म्हणून तिने थेट विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडला आणि विमानांच्या पात्यांवर चालायला सुरूवात केली. या घटनेनंतर विमानकंपनीने संबंधित महिलेला ब्लॅकलिस्ट केलं आहे. तर, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
‘द सन’च्या वृत्तानुसार, तुर्कीवरुन आलेले बोइंग 737-86N विमान युक्रेनच्या कीव शहरातील विमानतळावर लँड झाल्यानंतर ही घटना घडली. विमान लँड झाल्यानंतर या महिलेने खूप गरम होत असल्याची तक्रार केली, आणि मोकळी हवा घेण्यासाठी तिने बोइंग 737-86N चा इमर्जन्सी दरवाजा उघडला, व थेट विमानाच्या विंगवर जाऊन बसली.
“विमान लँड झाल्यानंतर जवळपास सर्व प्रवासी उतरले. ही महिलाही मागे मागे येत होती. पण तेवढ्यात तिने इमर्जन्सी दरवाजा उघडला आणि थेट विंगवर चालायला लागली. त्यावेळी महिलेचे दोन मुलं विमानाबाहेर आले होते आणि ते माझ्या बाजूलाच उभे होते. ते स्वतः देखील या प्रकारामुळे आश्चर्यचकीत झाले…ही आमची आई आहे असं ते मुलं म्हणत होते”, अशी माहिती विमानातील एका प्रवाशाने दिली.
बघा व्हिडिओ –
View this post on Instagram
घटनेनंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तिला याबाबत विचारणा केली असता खूप गरम होत असल्यामुळे विमानाच्या विंगवर गेल्याचं तिने सांगितलं. यानंतर युक्रेन इंटरनेशनल एअरलाइन्सने महिलेवर कारवाई करत तिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आहे. तसेच, विमान सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे महिलेला ब्लॅकलिस्ट केल्याचं एअरलाइन्सने म्हटलं असून तिच्यावर दंडात्मक कारवाईही व्हायला हवी अशी मागणी केली आहे.