Viral wedding card: लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका कार्डनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लग्नपत्रिकेच्या शेवटी पाहुण्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देणअयात आली आहे.एका लग्नपत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रत्येकजण लग्न करतो, परंतु प्रत्येकाचे लग्न प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. केवळ अशाच लोकांची लग्नं (Wedding) चर्चेत येतात, जे एकतर श्रीमंत किंवा सेलिब्रिटी आहेत. अशातच, लोक त्यांचे लग्न प्रसिद्ध करण्यासाठी काहीही करू लागले आहेत. काही लोक लग्नात पैसे खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात, तर काहींना खास ठिकाणी लग्न करून जगाच्या नजरेत यायचे असते. तसे, आजकाल चर्चेत येण्याचा आणखी एक मार्ग खूप प्रचलित आहे आणि तो म्हणजे लग्नपत्रिका. लोक त्यांच्या लग्नाची पत्रिका अनोख्या पद्धतीने छापत आहेत. आजकाल अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तुम्ही लग्नपत्रिकेत पाहिलं असेल पत्रिकेच्या शेवटी पाहुण्यांसाठी खास सूचना असतात. यात शक्यतो भांड्यांचा आहेर आणू नका, असं तर तुम्ही पाहिलंच असेल पण या लग्नपत्रिकेत मात्र काही वेगळंच लिहिलं आहे. या लग्नपत्रिकेत “कृपया दारू पिऊन येऊ नये” अशी सूचना लिहण्यात आली आहे. हा पाहून पाहुणे लग्नाला यायचं की नाही हे विचारत आहेत.

पाहा फोटो

हेही वाचा >> VIDEO: जळगांवच्या रस्त्यावर रात्री १२चा थरार; डॉक्टरांच्या आयुष्याचा असा झाला शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?

नेटकरी म्हणाले – वाचून क्षणभर गोंधळलो

ही लग्नपत्रिका पाहून लोक काहीजण आश्चर्यचकित झाले होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे. या अनोख्या लग्नाचे कार्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sonamgupta2323 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आले आहे, ज्याला आतापर्यंत ४१२,३७२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर लोकांनी विविध मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की ही “नेक्स्ट लेव्हल” आहे, तर कोणी “हे वाचून माझे मन गोंधळले” “आता आम्ही कोणत्याच लग्नाला जाययचं नाही का” असे लिहिले आहे.