चांगलं शिकून मोठ्या पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण एका तरूणानं गलेलठ्ठ पगाराची नोकरी नाकारून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणाच्या जिंदमध्ये राहणारा हिमांशु जैन या तरुणाला ‘अमेझॉन’कडून २२ लाखांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली होती. परंतु, हिमांशुला यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवेचा करायची होती. त्यामुळे हिमांशुने ही ऑफर नाकारात त्याने यूपीएससीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे या परीक्षेत तो देशातून ४४ वा आलाय.

हैदराबादच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर अमेझॉनमध्ये त्यानं इंटर्नशीप केली होती. त्यानंतर अमेझॉननं त्याला नोकरीची ऑफर दिली होती. पण त्याला आयएएस अधिकारी व्हायचं होतं. ‘आयएएस अधिकाराऱ्यांमध्ये देशात बदल घडवण्याची ताकद असते’ असं हिमांशु आपल्या शाळा महाविद्यालयातल्या शिक्षकांकडून नेहमीच ऐकायचा, तेव्हापासून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यानं उराशी बाळगलं आणि शिक्षणासाठी दिल्ली गाठली.

युपीएससी परीक्षेचा त्याचा प्रवासही संघर्षाने भरलेला होता. ही परीक्षा तो दोनदा नापास झाला. पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र ही परीक्षा त्याने उत्तीर्ण होऊन दाखवलीच. हैदराबादच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’मधून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने अॅमेझॉनमध्ये इंटर्नशीप केली. याकाळात अॅमेझॉनकडून त्याला २२ लाखांचं पॅकेज देण्यात आलं होतं, पण आयएएस अधिकारी होण्याच्या स्वप्नामुळे त्याने ही नोकरी नाकारली.