पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानी रडार व ढगांसंदर्भातल्य वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुंनी टीका झाली होती. त्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही मोदींच्या विरोधात ट्विट केले. उर्मिलांनी ट्विटर हँडलवरून आपल्या पाळीव श्वानासोबत एक फोटो शेअर केला होता. सध्या आकाशात काळे ढग नसल्यामुळे रोमिओचे कानही रडारचे सिग्नल पकडू शकत आहेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न त्यांच्याच अंगाशी आल्याचे दिसत असून त्यांनाच नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. काही टिप्पणी तर अत्यंत खालच्या दर्जाची आहेत.

उर्मिलांचीच खिल्ली उडवणारी काही ट्विट पुढीलप्रमाणे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत एअर स्ट्राईकपूर्वी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला दिल्याचे म्हटले होते. तसेच मोदींचं ते विधान गुजरात भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही ट्विट करण्यात आलं होतं. मात्र, सोशल मीडियामध्ये खिल्ली उडायला सुरूवात झाली होती. त्यांच्या त्याच वक्तव्यावरून उर्मिला मातोंडकर यांनी एक फोटो ट्विट करत पंतप्रधानांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.