Baghpat Inspector Slaps Uncle Of Missing Girl Student : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचं काम चालतं. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन करण्याची जी जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे, ती जबाबदारी प्रामाणिकपणे निभावण्याचं काम पोलीस दलात होतं का, हा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न उपस्थित करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलीस निरीक्षक एका व्यक्तीला कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करत बदली केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना उत्तर प्रदेशातील बागपत येथील बिनौली पोलीस ठाण्यात घडलीय. बिनौली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक या व्हिडीओमध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कानशिलात मारताना दिसत आहेत. बिरजा राम असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाची हरवल्याची तक्रार केल्यानंतर चौकशीसाठी हा व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय बिनौली पोलिस स्टेशनच्या प्रभारींकडे माहितीसाठी आले होते.

आणखी वाचा : ‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO

प्रत्यक्षात या व्यक्तीची भाची चार दिवसांपासून बेपत्ता होती. तक्रारीनंतर काय प्रगती झाली याची माहिती घेण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले होते. मात्र त्याऐवजी पोलीस निरीक्षकानेच त्याला कानशिलात मारली. बागपतचे एसपी नीरज कुमार जदौन म्हणाले की, चपराक मारण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, पोलीस निरीक्षक बिरजा राम यांनी १७ सप्टेंबर रोजी पीडितेच्या कुटुंबासोबत अनैतिक वर्तन केले होते. त्यामुळे बिरजा राम यांची पोलीस लाईन्समधून बदली करण्यात आली आहे.

आणखी वाचा : पाणी ओसंडून वाहणारा रस्ता ओलांडण्यास मदत करून हा माणूस पैसे कमवतो, पाहा VIRAL VIDEO

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बिनौली पोलिस स्टेशन आणि त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच ओमवीर नावाच्या पीडित व्यक्तीने एएनआयला सांगितले की, त्याची भाची ४ दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणातील प्रगतीची माहिती घेण्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले होते. तो वारंवार पोलीस निरीक्षकांना भाचीबाबत विचारणा करत होता. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्याला सर्वांसमोर चोप दिला. या अनैतिक वर्तनासाठी आरोपी पोलीस निरीक्षकाची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

आणखी वाचा : सापाला फक्त माणूसच नव्हे तर चिंपांझीं सुद्धा घाबरतात, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : याला म्हणतात खरं प्रेम! पतीला मागे बसवून आजीने मोपेड चालवली

व्हायरल व्हिडीओच्या आधारे तात्काळ कारवाई करत बागपत पोलिसांनी आरोपी पोलिस कर्मचाऱ्याची बदली केली आहे. हे प्रकरण खूपच आश्चर्यकारक आहे. जनतेची सेवा करण्यासाठी बसलेल्या पोलिसांनी पीडितेला चपराक मारली. वारंवार प्रश्न विचारल्याने पोलीस निरीक्षक इतके अस्वस्थ झाले की त्यांनी हात उगारला. जेव्हा पीडित व्यक्ती आधीच खूप अस्वस्थ होता. त्यांची भाची चार दिवसांपासून बेपत्ता होती. या प्रकरणी प्रगतीकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, तो उलट पोलिस कर्मचाऱ्याच्या रोषाचा बळी ठरला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh bagpat police inspector transferred ater slaps man video viral who complained of missing niece prp
First published on: 19-09-2022 at 12:34 IST