Heart Attack video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील आग्राच्या कमला नगरमधून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाचा मिठाईचा दुकानात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेला व्यक्ती पु्न्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला, तर आयुष्याच्या सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते. जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. आपल्या समोरच भयानक घटना घडतात, असं नाही. परंतु, थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येतात.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही व्यक्ती आपल्याला एका ठिकाणी उभे असलेले दिसत आहेत तर काही व्यक्ती जमिनीवर बॉक्स पॅकींगचे काम करताना दिसत आहेत.जसवीर ही जमिनीवर बसून काम करत आहे अशातच काही वेळानंतर जसवीर अचानक बसलेल्या ठिकाणावरुन जमिनीवर बेशुद्ध पडतो. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात येथे मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: उतावळा नवरा…! सर्वांसमोर नवरदेवाने नवरीला असं केलं किस, बघून ‘कोमात’ गेले लोक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडिओ @priyarajputliveया अकाउंटवरुन एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचे समजत आहे. याआधीही जीममध्ये व्यायाम करताना, मैदानात खेळताना, डान्स करतना हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण बसल्या जागी असं मृत्यूनं गाठलेलं पहिल्यांदाच पाहिलं असेल. यावर नेचकरीही वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकानं म्हंटलं “कोणता क्षण शेवटचा असेल सांगू शकत नाही.”