scorecardresearch

‘फुटूरे’ धोक्यात! शाळेतील बाईंचं इंग्रजी ऐकून लागेल वेड! Video मधील प्रत्येक शब्द ऐकताना पोट धरून हसाल

School Teacher Viral Video गूगल, नेचर, इंजिनिअर, फ्युचर, डेंजरस असे साधे शब्द उच्चारताना शिक्षिका असं काही बोलून जातात की विश्वास बसणेच कठीण होते.

Video School Teacher Mispronounce English Words Funny Compilation Clip Gone Viral Hilarious Trends Online
शाळेतील बाईचं इंग्रजी ऐकून लागेल वेड! Video मधील प्रत्येक शब्द ऐकताना पोट धरून हसाल (फोटो: इंस्टाग्राम)

English Speaking Viral Video: इंग्रजी भाषा ही काही मूळ भारतीय भाषा नाही, आपण आता सोयीप्रमाणे, जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या भाषेचा आधार घेतला आहे. पण काही वेळा काही मंडळी इंग्रजी बोलताना अशा काही चुका करतात की भाषेलाच आधार घ्यायची वेळ येऊ शकते. एखादी भाषा संवादाचे माध्यम आहे हे, अर्थ समजला की झालं हे खरं आहे. पण काहीवेळा आपल्याकडून उच्चारातून झालेल्या चुका या अर्थाचा अनर्थ करू शकतात. त्यात शिक्षकांकडून अशा चुका होणे हे जरा न पटण्यासारखेच आहे. अलीकडेच सोशल मीडियावर अशाच काही इंग्रजी शिकवणाऱ्या बाईंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक एक शब्द उच्चारताना या शिक्षिका इतक्या चुकतात की त्यांना शिक्षक कुणी बनवलं हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडत आहे.

तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की शिक्षिका फळ्यावर इंग्रजी शब्द लिहून एक एक अक्षर वाचून मग त्याचा उच्चार कसा करायचा हे शिकवत आहेत. व्हिडिओमध्ये समोरच्या मुलांचा आवाज ऐकल्यास हे प्राथमिक शाळेतील दृश्य असावे असा अंदाज येतो. गूगल, नेचर, इंजिनिअर, फ्युचर, डेंजरस असे साधे शब्द उच्चारताना शिक्षिका असं काही बोलून जातात की विश्वास बसणेच कठीण होते. फार उत्सुकता न ताणता चला आपण पण बघुयात..

हे ही वाचा<< पैशांचा पाऊस! ‘या’ कंपनीने ४० कर्मचाऱ्यांना दिला ७० कोटींचा बंपर बोनस; नोटांचे बंडल उचलताना झाली दमछाक

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आपण हसून हैराण झालो अशा कमेंट्स केल्या आहेत. खरोखरच एखाद्या शिक्षिकेकडून अशा चुका होणे हे चिंताजनक आहे असेही काहीजण म्हणत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ बघून काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:33 IST