Astronaut Captures Rare Thunder Video: अंतराळातील विविध घटनांविषयी आपल्याला उत्सुकता असतेच. अगदी एखाद्या ताऱ्याची किंचित हालचाल सुद्धा पृथ्वीवरून पाहताना आश्चर्याहून कमी वाटत नाही. पण सध्या समोर येणारा एक व्हिडीओ खरोखरच निसर्गाचा दुर्मिळ अविष्कार आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे (ESA) अंतराळवीर अँड्रियास मोगेनसेन यांनी लाल रंगाच्या विजेचा एक अविश्वसनीय फोटो काढला आहे. मोगेनसेन थोर-डेव्हिस प्रयोगाचा एक भाग म्हणून, प्रत्येक शनिवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कपोला वेधशाळेच्या वांटेज पॉईंटवरून वादळांचे फोटो काढतात, याअंतर्गत आता हा नवा व्हिडीओ व फोटो सध्या समोर आला आहे.

पृथ्वीच्या वर ४० ते ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या लाल विजेचा ट्रान्सिएंट ल्युमिनस इव्हेंट (TLE) दर्शविणारा पहिली फोटो प्रदर्शित झाला आहे. मोगेनसेन यांनी हा फोटो व व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देत लिहिले की, “ढगांच्या पलीकडे हे एक आकर्षक जग आहे. तुम्ही आता मेघगर्जना झाल्यावर कडाडलेल्या लाल विजेचा फोटो पाहात आहात. मी डॅनिश टेक्निकल युनिव्हर्सिटी (DTUSpace) च्या थोर-डेव्हिस प्रयोगाचा एक भाग म्हणून हा फोटो क्लिक केला होता

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

रेड स्प्राइट्स म्हणजेच लाल रंगाची वीज ही दुर्मिळ घटना वैज्ञानिक भाषेत ट्रान्झिएंट ल्युमिनस इव्हेंट्स म्हणून ओळखली जाते. रेड स्प्राइट्स जमिनीपासून सुमारे ४० ते ८० किमी वर तयार होतात हे आपण डेव्हिस कॅमेऱ्यातील व्हिडिओमध्ये पाहू शकता. मेघगर्जना झाल्यानंतर लाल स्प्राइट्स या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Video: कॅमेऱ्यात कैद झाली लाल वीज

हे ही वाचा<< ४९० कोटींचं लग्न लागताच आता नवरदेवाला २५ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होणार? पूर्ण प्रकरण जाणून व्हाल थक्क

दरम्यान, अशा प्रकारची दुर्मिळ घटना कॅमेऱ्यात कैद होण्यासाठी कॅमेरा वेग सुद्धा विजेच्या इतकाच वेगवान असणे आवश्यक असते. अशा घटनांसाठी डेव्हिस कॅमेरा विशेष आहे. आपल्या डोळ्यातील रेटिनासारखाच हा कॅमेरा असून तो प्रकाशातील बदल लगेचच टिपू शकतो ज्यामुळे तो प्रति सेकंद १००.००० फोटो सुद्धा काढू शकतो, अशीही माहिती मोगेनसेन यांनी दिली आहे.

Story img Loader