रस्त्यावर गाडी चालवताना किंवा सिग्नलला गाडी थांबली असताना जरा सावधान! नाहीतर कधी चोर गंडा घालून निघून जाईल हे तुम्हालाही कळणारही नाही. सध्या सोशल मीडियावर दिल्लीतल्या रस्त्यावरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अत्यंत शिताफीनं चोरानं गाडीतला मोबाईल चालकाच्या डोळ्यादेखत चोरलाही अन् त्याला समजलंसुद्धा नाही असं या व्हिडिओतून दिसत आहे.

एक व्यक्तीची गाडी वाहतूक कोंडीत अडकली होती. हा चालक तिथून बाहेर पडण्यासाठी वाट शोधत होता. एवढ्यात एक चोर मागून आला आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या चालकाला बडबडायला सुरूवात केली. गाडीच्या काचा बंद असल्यानं या चोरानं चालकाला गाडीच्या काचा खाली करायला सांगितलं. चालकानं त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी गाडीची काच खाली केली. पण यावेळी हातचलाखीने या चोरानं गाडीतला मोबाईल लंपास केला आणि या चालकाला त्याची पुसटशीही कल्पना आली नाही. तेव्हा गाडी चालवताना तुम्ही सजग राहा नाहीतर तुमच्यासोबतही असा प्रकार घडू शकतो.

दक्षा जैदका या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तो तीन लाख ४५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.