scorecardresearch

भर मीटिंगमध्ये IAS अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; Video पाहून लोकं संतप्त; म्हणाले, “३३ वर्ष आमची.. “

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या IAS अधिकाऱ्याच्या एका व्हिडीओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अधिकाऱ्याची भाषा ऐकून अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.

Video IAS Officer Angry Abuse Clip Goes Viral People Gets Furious Demands To Resign Watch Here
भर मीटिंगमध्ये IAS अधिकाऱ्याने केला शिवीगाळ; Video पाहून संतप्त लोकं म्हणतात, “३३ वर्ष आमची.. “(फोटो: ट्विटर)

IAS Officer Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या IAS अधिकाऱ्याच्या एका व्हिडीओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्विटरवर उत्कर्ष सिंह या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये IAS अधिकारी आपल्या राज्यातील नागरिकांना शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जनसत्ताच्या माहितीनुसार या व्हिडिओमधील अधिकारी हे IAS के. के. पाठक असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु असणाऱ्या मीटिंगमध्ये त्यांनी राज्यातील नागरिकांवर टीका केल्याचे समजत आहे. अधिकाऱ्याची भाषा ऐकून अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, IAS अधिकारी मीटिंगमध्ये बोलत असताना संतप्त स्वरात बिहारमधील नागरिकांच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर टीका करत आहे. यावेळी चेन्नईमधील शिस्तीची तुलना बिहारमधील लोकांशी ते करतात. ते म्हणतात, “कधी चेन्नईत जा, तिथे तुम्हाला सिग्नल लाल असताना कुणी हॉर्न वाजवताना पाहायला मिळेल का? पण पटनामध्ये बेली रोडवर लोक हॉर्न वाजवून उच्छाद मांडतात, आता यावर मी डेप्युटी कलेक्टर्सची शाळा घेणार आहे. त्यांना येउदे त्यांचा कसा बँड वाजवतो ते बघा..” या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्याने काही आक्षेपार्ह्य शब्द सुद्धा वापरतात.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर कमेंट करून संताप व्यक्त केला आहे. ३३ वर्षांपासून हा अधिकारी बिहारमध्ये असून इथेच जेवत आहे आणि आता त्याच राज्यातील लोकांना शिव्या देत आहे अशा पद्धतीच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींनी संबंधित अधिकारी हा नितीश कुमार यांचा चाहता असल्याचे सुद्धा म्हंटले आहे.

दुसरीकडे, काही युजर्सनी IAS अधिकाऱ्याच्या मताला सहमती दर्शवली आहे. दक्षिणेकडील राज्यात खरोखरच शिस्त आहे पण हीच शिस्त व मुळात इतरांचा आदर करण्याची पद्धत उत्तरेत दिसत नाही असेही काहींनी म्हंटले आहे.

IAS अधिकारी मीटिंगमध्ये भडकले

हे ही वाचा<< पैशांचा पाऊस! ‘या’ कंपनीने ४० कर्मचाऱ्यांना दिला ७० कोटींचा बंपर बोनस; नोटांचे बंडल उचलताना झाली दमछाक

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, अधिकारी के. के. पाठक हे दारूबंदी व निर्बंध या मोहिमांचा भाग होते. यापूर्वी ते बिहारच्या ग्राम विकास विभागाचे डीजी असते. या व्हिडिओनंतर अनेकांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 18:11 IST
ताज्या बातम्या