महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानांवरुन राज्यातील राजकारणाम मोठा वाद निर्माण झालेला असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्दावरुन राज्यपालांवर निशाणा साधलाय. पुण्यामध्ये मनसेच्या १६व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दिलेल्या भाषणादरम्यान राज यांनी कोश्यारी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली. सावित्रीबाई फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्याची नक्कल करत राज यांनी राज्यपालांवर टीका केली. “तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं. नको तिथं बोटं घालायची,” अशा शब्दांमध्ये राज यांनी टीका केली. राज ठाकरे नक्की काय म्हणाले पाहुयात…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.