Inspirational Story : प्रत्येकाचं एक स्वत:चं एक स्वप्न असतं. काहीतरी वेगळं, हटके आणि मोठं करायचं स्वप्न असतं. हे स्वप्न मनात ठेवून प्रत्येकजण त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करतात. काही लोकांचं स्वप्न खूप लवकर पूर्ण होतं तर काही लोकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायला खूप वेळ लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने तिचा सुंदर अनुभव सांगितला आहे. तिने वयाच्या २० व्या वर्षी तिचे स्वप्न पूर्ण केले आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
तरुणी सांगते, “मी २० वर्षाची आहे मी लंडन गाठलं. मी येथे सुट्ट्या घालवण्यासाठी आणि कामासाठी आले होते. मी येथे माझ्या स्वत:च्या पैशांनी आले होते. मला माझ्या आईवडिलांना येथे आणायचे आहे. माझं स्माइल करणं मी थांबवू शकत नाही. मला वाटतं माझ्यातल्या तरूणपणाला माझा आता खूप अभिमान वाटत असेल. मला तिला सांगायचं आहे की मी करून दाखवलं. मी स्वप्न पाहिलं होतं की काहीतरी करेन आणि मी केलं. मला आशा आहे की प्रत्येकाचं स्वप्न असावं आणि एकदिवस त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. मी इथे आहे. मी खूप आनंदी आहे. हे खूप सुंदर आहे. मला नेहमी यशस्वी स्त्री बनायचे होते आणि मी योग्य मार्गावर आहे. हे आनंदाश्रू आहेत. ही माझी सर्वात सुंदर आठवण असणार आहे. माझ्या आयुष्यात असणाऱ्या सर्व लोकांची मी आभारी आहे. कारण त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि मी करून दाखवलं आणि मी करून दाखवेल.” हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक झाले असतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
_yukth.a या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “We’re just getting started..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तु खूप खास आहे. मला तुझा खरंच अभिमान वाटतो.” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला का रडू येत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तू माझी प्रेरणा आहे. तु खूप सुंदर महिला आहे आणि मला आशा आहे की तू सर्वकाही करू शकते.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.