Viral Video : प्राचीन काळापासून स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागला आहे. समान अधिकार, शिक्षण आणि मिळवण्यासाठी लढावे लागले. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. पण घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी त्यांना आजही पार पाडावी लागते. काही महिला लग्नानंतर करिअरकडे पाठ फिरवतात. घर, कुटुंब, व मुलांच्या संगोपनाला वेळ देतात. पण समाजात काही महिला अशा आहेत ज्या दुहेरी भूमिका पार पाडतात.

सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या तान्हा बाळाला घेऊन चक्क परीक्षेला आलेली दिसत आहे आणि बाळाला कुशीत घेऊन पेपर सोडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तान्हा बाळाला घेऊन परीक्षा द्यायला आली आई

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वर्गखोली दिसेल. या वर्गखोलीत अनेक तरुणी बाकावर बसून पेपर सोडवताना दिसत आहे. पण या सर्व तरुणींमध्ये एका महिला सुद्धा आहे. तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती बाळाला कुशीत घेऊन पेपर सोडवताना दिसत आहे. पेपर सोडवताना तिचे बाळाकडे सुद्धा लक्ष आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. शिक्षणाची ओढ असेल आणि आयुष्यात पुढे जायची जिद्द असेल तर एक स्त्री सर्व अडचणींवर मात करू शकते. तिच्यातील आईपण जपत स्वत:ला सिद्ध करू शकते. कोणीतरी लपून हा व्हिडीओ काढला आहे, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्व जण या आईचे कौतुक करत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

girlzfactsofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही महिला कमबॅक करणारच” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या महिलेला खरंच सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “नारीशक्तीला सलाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “हो, खरंच स्त्री काहीही करू शकते.. ” एक युजर विचारतो, “तिचा नवरा सासू सासरे कुठे आहे?” तर एक जण लिहितो, “महिलांना आजही सहकार्याची गरज आहे”
यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.