Viral Video : सोशल मीडियावर लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण रिल्स व्हिडीओ बनवताना दिसतात. कधी गाणी म्हणताना तर कधी डान्स करताना दिसतात. कधी कोणी जुगाड सांगतात तर कधी कोणी मिमिक्री करतात. रिल बनवण्यासाठी काही लोक वाट्टेल ते करतात. कधी धोकादायक स्टंट करताना दिसतात कर कधी कोणाबरोबरही प्रँक करताना दिसतात.
मोबाईलच्या या व्यसनात आता रिलने भर टाकली आहे. लोक रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि त्यावर लाइक्स आणि कमेंट्स मिळवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क मंदिरात जाऊन शिवलिंगसमोर रिल बनवताना दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहे.
भक्ती श्रद्धेचा भाग आहे. अनेक जण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात. पण आता रिलच्या नादात लोक सर्वकाही दिखाव्यासाठी करताना दिसतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला चक्क मंदिरात रील बनवताना दिसत आहे. ती शिवलिंगसमोर गाण्याचे लिरीक्स म्हणत रील बनवताना दिसत आहे. “तडपाओगे तडपा लो” या जुन्या गाण्यावर तिने रील बनवली आहे. मंदिरातील इतर महिला तिच्याकडे बघत आहे. रीलच्या नादात देवालाही सोडले नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
कुंभकरण या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हिला मंदिरात कोणी आत येऊ दिले” तर एका युजरने लिहिलेय, “महादेव यांना बुद्धी दे” आणखी एका युजरने लिहिलेय, “असं वागून देवाचा अपमान करू नका” एक युजर लिहितो,”रीलच्या नादात लोक कसे वागतात?” तर एक युजर लिहितो, “देवाला तरी सोड बाबा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. या पूर्वी सुद्धा असे अनेक रिल्स व्हायरल झाले आहेत. काही लोकांनी तर रिल्सच्या नादात जीव सुद्धा गमावला आहे.