Video : ९० वर्षांची आज्जी केस कापायला थेट पार्लरमध्ये पोहचली, सांगितलं कारण, “मला कोणाला त्रास देणं….” व्हिडीओ पाहाच

Viral Video : असं म्हणतात, जगण्याचा आनंद घ्यायला वयाचे बंधन नसते. तुम्ही कोणत्याही वयात मनसोक्त जीवनाचा आनंद घेऊ शकता. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक हेअरस्टायलिश एका आज्जीची हेअरकट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हेअर स्टाइलिशने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने या आज्जीबरोबरचा तिचा अनुभव सांगितला आहे.

९० वर्षांची आज्जी केस कापायला थेट पार्लरमध्ये पोहचली

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हेअर स्टायलिशस या आज्जीचे केस कापताना दिसत आहे. आज्जी मोठ्या आवडीने केस कापून घेत आहे. आज्जी केस कापताना गप्पा सुद्धा मारताना दिसत आहे. आज्जीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज अचानक पार्लरचे दार वाजले. पहिलं तर एक वयस्कर आजी मला म्हणाल्यात. दार पूर्ण उघड आत यायचं आहे. मला केस कापायचेत. माझं वय ९० वर्षे आहे. हात मागे जात नाही. खूप वेळ कोणाला त्रास देणं मला आवडत नाही, म्हणून केस असे काप की कंगवा फिरवला की झालं. खूप खूश होऊन गेल्यात घरी.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

kalyani_makeover_studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमच्या पार्लरमधील पहिली सुंदर तरुण स्त्री. ती फक्त ९० वर्षाची आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुणाला त्रास नाही द्यायचा त्यातून आपण सोपा मार्ग काढायचा…ही इतकचं जरी शिकता आला आजी कडून तर खूप वाद मिटतील” तर एका युजरने लिहिलेय, “भारी. आज्जीला बघूनच खूप सकारात्मक वाटत आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजींच्या विचारलाच सलाम” एक युजर लिहितो, “किती गोड आज्जी आहे” तर एक युजर लिहितो, “फायनल लूक दाखवायचा ना” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी आज्जीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.