Viral Video : “हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हे गाणं आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेल. माणसाने नेहमी माणुसकी दाखवावी. प्राणी मात्रांवर दया करावी. योग्य वेळी दाखवलेली माणुसकी नेहमी बहुमूल्य आहे. कधी एखाद्याला मदत करावी तर कधी कोणाला संकटातून बाहेर काढावे. आपण दाखवलेल्या माणुसकीने अनेकदा समोरच्याचे आयुष्य बदलू शकते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती दिसेल.ही वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना दिसत आहे. या वृद्ध व्यक्तीने जेसीबीच्या मदतीने या कुत्र्याचा जीव वाचवला आहे. त्यांनी जेसीबीला बांधलेल्या हारनेसच्या सहाय्याने ते एका जागेवर अडकले आहे आणि पाण्यातून कुत्र्‍याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ते आपला हात समोर करत कुत्र्याला ओढत वर घेऊन येतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ चीनमधील आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

guardianpawsfoundation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ज्यांना प्राण्यांची किंमत नाही, अशा लोकांना प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात चीनमधील एका वृद्ध व्यक्तीला पुरामध्ये अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना दिसत आहे. येथे महत्त्वाची शिकवण म्हणजे करुणा, मदत, येथे महत्त्वाची शिकवण म्हणजे करुणा आणि वय, स्टेटस किंवा मर्यादा न ठेवता मदत करण्याची इच्छाशक्ती असावी.चला आपण प्राण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करू या कारण ते खरोखरच चांगुलपणासाठी पात्र आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “अशी माणुसकी प्रत्येकाने दाखवायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुम्ही कुत्र्याचा जीव वाचवला, तुमचे खूप खूप आभार” एक युजर लिहितो, “तुम्ही खरंच पुण्य कमावले” तर एक युजर लिहितो, “खूप छान काम केलं, देव तुमच्या नेहमी पाठीशी आहे” अनेक युजर्सनी त्या वृद्ध व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये हार्टचे इमोजी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.