Holi 2024 : आली रे आली… होळी जवळ आली. उत्साह, जल्लोष आणि रंगांनी खेळली जाणारी होळी आता अगदी काही दिवसांवर आलेली आहे. रंगांचा हा उत्सव भारतातील सर्व भागांमध्ये आनंदाने साजरा केला जातो. मात्र, यंदाची होळी फक्त चेहऱ्यावर रंग लावून नाही, तर तुमच्या जेवणामधूनही साजरी करू शकता. मी नेमके काय म्हणत आहे ते तुम्हाला खरतर व्हायरल होणाऱ्या ‘होळी बॉम्ब इडली’चा व्हिडीओ पाहूनच समजू शकते.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील rohinis.kitki नावाच्या अकाउंटने एक भन्नाट आणि आगळीवेगळी ‘होळी बॉम्ब इडली’ नावाची रेसिपी शेअर केली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यात काय वेगळे? खायचे रंग वापरले की काम झाले.. पण, व्हिडीओ शेअर करणाऱ्या रोहिणीने तसे न करता सर्व नैसर्गिक रंग वापरले आहेत. यासाठी तिने स्वयंपाकघरात बागेतील काही खास गोष्टींचा उपयोग केलेला आहे. ही ‘होळी बॉम्ब इडली’ नेमकी कशी बनवली आहे ते पाहू. तसेच यावर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यादेखील पाहू.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
ग्रामविकासाची कहाणी

हेही वाचा : Hair care : जवळ येतेय होळी; रंग खेळताना ‘आयुर्वेदिक’ पद्धतीने घ्या केसांची काळजी! पाहा टिप्स…

व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्या इडल्यांना अत्यंत सुंदर असा निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी, लाल असे रंग दिलेले आहेत. हिरव्यासाठी पालकाचा रस वापरला आहे. गुलाबी रंगासाठी बीटाचा रस, पिवळ्या रंगासाठी हळद; तर लाल रंगासाठी बीटाचा रस आणि हळद यांना एकत्र केले आहेत. तसेच निळ्या रंगासाठी चक्क गोकर्णाच्या फुलांचा वापर केला आहे. गोकर्णाची फुले पाण्यात मिसळून त्या फुलाचा निळसर रंगाचा रस इडलीच्या पिठात मिसळला आहे. तयार केलेले सर्व रंग ती एकेक करून इडलीच्या तयार पिठामध्ये मिसळून घेते. पुढे इडली पात्रामध्ये प्रत्येक रंगाच्या इडली पिठाचे चमचाभर पीठ घालून सर्व इडल्या शिजवून घेते.

अशी ही रंगीत इडल्यांची भन्नाट रेसिपी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी काय म्हणतात ते पाहा.

“खरंच या अगदी होळी खेळलेल्या इडल्यांसारख्या दिसत आहेत”, अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. “हळद घातलेली इडली चवीला चांगली लागेल का?” असा दुसऱ्याने प्रश्न केला आहे. “पण, चव तीच लागणार असेल तर एवढे कष्ट कशाला करायचे?” असे तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे. “खूप भारी कल्पना आहे, एकदम वेगळी रेसिपी आहे. जी लोकं याला नावं ठेवत आहेत, त्यांना जर हे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये खायला दिलं तर अगदी आवडीने आणि हवे तेवढे पैसे भरून खातील, त्यामुळे अशा प्रतिक्रियांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, असे चौथ्या व्यक्तीने लिहिले. “खूपच क्यूट आहेत या इडल्या.. मस्तच”, असे पाचव्याने लिहिले आहे.

हेही वाचा : इन्फ्ल्यूएन्सरने ‘आयफोनमध्ये’ कुस्करले उकडलेले अंडे! किळसवाणा Video पाहून नेटकरी झाले कमालीचे हैराण…

इन्स्टाग्रामवर @rohinis.kitki नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ८.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.