Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. वडीलाचे मुलीवर जीवापाड प्रेम असते पण ते त्यांना व्यक्त करता येत नाही आणि मुलीसाठी तर तिचे वडील सुपरहिरो असतात. वडीलांची साथ मुलीसाठी एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नसते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात बाप लेक फुगडी खेळताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक धार्मिक कार्यक्रम दिसेल. स्टेजवर असलेल्या खूर्चीवर एक गुरू बसलेले दिसत आहे आणि त्या स्टेजसमोर बाप लेकीची फुगडी रंगलेली दिसत आहे. वारकरी पद्धतीने हे बाप लेक फुगडी खेळताना दिसतात. सुरुवातीला ते ठेका धरतात आणि आनंद लुटताना दिसतात आणि शेवटी फुगडी खेळतात. फुगडी खेळताना पाहून काही लोक भावुक होईल. काही लोकांना त्यांच्या लेकीची तर काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “जेव्हा बाप पाठीशी खंबीर असतो तेव्हा मुलगी सुद्धा राजासारखी जगते” हा व्हिडीओ जुना आहे जो सध्या पुन्हा व्हायरल होतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओतील तरुणी ही युवा कीर्तनकार, समाजप्रबोधनकार शिवलिला पाटील आहेत. त्यांनी त्यांच्या shivlila_patil_official_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाप लेकीची जोडी , गुरूच्या दारी रंगली फुगडी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. राम कृष्ण हरी” तर एका युजरने लिहिलेय, “बरोबर आहे ताई, बाप तो बापच असतो जय श्री राम कृष्ण हरी माऊली” आणखी एका युजरने लिहिलेय, “बरोबर आहे बाप पाठीशी असला तर मुलगी राजासारखा जगते. देव माणुस आहे बाप लेकीसाठी” एक युजर लिहितो, “सर्वांच्या आयुष्यात नाही येत असे दिवस” आणखी एक युजर लिहितो, “बाप आणि लेकीचे नातेच अनोखे आणि जगावेगळे असते.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.