आपल्या नात्यातल्या मायेच्या व्यक्तीचा मृत्यू ही फार दु:खद घटना असते. त्यातही तो किंवा ती आपला जोडीदार असेल तर तो चटका आयुष्यभर राहतो. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत रंगवलेली सुखी आयुष्याची सगळी स्वप्नं एका क्षणात कोसळून पडतात. पुन्हा आयुष्य सुरू करावंच लागतं पण जुन्या आयुष्याचे तुकडे मनाला टोचत राहतात, सारखं मागे खेचत राहतात. मनातली घालमेल काही केल्या जात नाही.

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमाच्या या सगळ्या भावनांचा धांडोळा घेतला जात असतानाच चीनमधल्या एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या जोडप्यातल्या महिलेच्या माहेरच्या काही गोष्टींना कंटाळून बिल्डिंगच्या टेरेसवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेली. आपली बायको असं काही करत असल्याचं पाहत तिच्या नवऱ्याने जिवाच्या आकांताने टेरेसवर धाव घेतली. त्याच्या बायकोने उडी मारली आणि तिला वाचवायला पुढे आलेल्या तिच्या पतीने तिच्या केसांना घट्ट धरून ठेवलं. ती आपल्या पतीला ‘सोड मला, सोड मला’ अशी विनवणी करत होती पण काळजात धडकी भरलेल्या तिच्या पतीने त्याही परिस्थितीत संयम राखत तिच्याशी बोलत जवळपास तीन मिनिटं तिला धरून ठेवलं.

 

सौजन्य- यूट्यूब

या महिलेची उडी सुदैवाने टेरेसच्या कठड्याखालच्या एका पाईपवर पडली होती. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिच्या केसांना धरून ठेवलेलं असतानाही तिला इजा झाली नाही. पण हा पाईप फार मजबूत नव्हता आणि या महिलेच्या वजनामुळे तो वाकत होता. कुठल्याही क्षणी ही महिला खाली पडण्याचा धोका होता. बिल्डिंगवर घडत असलेला हा प्रकार पाहून पोलिसही त्या टेरेसवर गेले आणि त्यांनी या दोघांची सुटका केली. या नवऱ्याने आपल्या बायकोला आधार देत तिला प्रेमाने घरी नेलं.

[jwplayer nMvjHMIK]