जगातील सर्वात वेगवान प्राण्यांच्या यादीत चित्त्याचं नाव येतं. ताशी ११० किलोमीटर वेगानं धावणाऱ्या या चित्त्याची जर का जगातल्या सर्वात वेगवान फॉर्म्युला कारशी शर्यत लावली तर? ही शर्यत पाहणं किती भारी आणि रोमांचकारी असेल नाही का? त्यातून या शर्यतीत चित्ता बाजी मारेन की वेगवान कार हे पाहणं त्याहून औत्सुक्याचे ठरेल. नुकताच ‘एफआयए फॉर्म्युला इ’ या फेसबुकपेजवरून चित्ता आणि फॉर्म्युला इ कारच्या शर्यतीचा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला.

Viral : वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशाची जेव्हा सटकते

बदलतं हवामान आणि त्याचा चित्त्यासारख्या प्राण्यावर होणारा परिणाम या समस्येवर जगाचं लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. सध्या आफ्रिका आणि आशियाच्या जंगलात फक्त ७१०० चित्ता उरले आहेत. नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यानं या प्राण्यांच्या संख्येवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. म्हणून दिवसेंदिवस या प्राण्याचं अस्तित्त्व धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे एक दिवस हे प्राणीच नष्ट होईल अशी भीती अनेकांना आहे, म्हणूनच लोकांमध्ये जनजागृती करण्याचा या व्हिडिओमागचा उद्देश आहे.

ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

फॉर्म्युला कार चालक जीन इरिका वर्जने चित्त्याचा प्रतिस्पर्धी होता. आफ्रिकेतल्या ओसाड माळरानावर या दोघांची शर्यत लागली होती. दोघांचाही वेग १०० किलोमीटर प्रति तासांहून अधिक असल्यानं यात कोणी बाजी मारली हे पाहायचं असेल तर मात्र तुम्हाला शेवटपर्यंत हा रोमांचकारी व्हिडिओ पाहावा लागेल.