दरवर्षी ख्रिसमस आयलँडवर कोट्यवधी संख्यनं रेड क्रॅब स्थलांतर करतात. ‘रेड क्रॅब’ ही लाल रंगाच्या खेकड्याची स्थानिक प्रजाती असून ती फक्त ख्रिसमस आयलँडवर पाहायला मिळते. संपूर्ण रस्त्यावर कोट्यवधी संख्येनं समुद्राच्या दिशेनं तुरुतुरु चालत जाणारे खेकडे पाहणं ही वेगळीच पर्वणी असते. याकाळात ख्रिसमस आयलँडवरचे अनेक रस्ते बंद केले जातात. त्यामुळे या खेकड्याचं स्थलांतर सुरू असेपर्यंत संपूर्ण परिसर अगदी लाल भडक दिसतो. दूरदूरपर्यंत जिथे नजर जाईल तिथपर्यंत या रेड क्रॅबशिवाय काहीच दिसत नाही. नर, मादी, नुकतीचं जन्मला आलेली पिल्लं समुद्राच्या दिशने कूच करतात. खेकड्यांची ही ‘लाल सेना’ पाहण्यासाठी शेकडो पर्यटक किनाऱ्यावर येतात.
बायकोच्या छळाला वैतागलेली ‘ही’ व्यक्ती ९ वर्षांपासून राहते विमानतळावरच
हे खेकडे आपला अर्ध्याधिक जीवनकाळ वर्षावनात व्यतित करतात. सकाळच्या सुमारास हे खेकडे अधिक सक्रिय असतात. सुर्यप्रकाशाचा त्रास होत असल्यानं ते सावलीत राहणं पसंत करतात. ‘नॅशनल जिओग्राफीक’च्या माहितीनुसार साधरण ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या काळात यांचं स्थलांतर सुरू होतं. हा काळ त्यांच्या विणेचा हंगाम असतो. वर्षावनातून समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी त्यांना ९ ते १८ दिवसांचा कालावधी लागतो. रेड क्रॅब अनेकदा गाड्याचे टायरदेखील पंक्चर करतात. त्यामुळे स्थलांतराच्या मार्गावरील अनेक रस्ते हे आठवडाभरासाठी बंद करण्यात येतात.