सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही रडवणारे असतात. सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच प्रांण्याचे नव नवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात. जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आपल्याला व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यात कधी हे प्राणी शिकार करताना दिसतात, तर कधी एकमेकांवर हल्ला करताना. मात्र, आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो भावनिक आहे. आपल्या मुलाला कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी आई प्रत्येक वादळाशी लढायला तयार असते. असाच हा व्हिडिओ हृदयस्पर्शी आहे.

खरंतर हा व्हिडीओ एका आई आणि मुलाची मदत करणाऱ्या व्यक्तीचा आहे. अनेक लोकं प्रांण्याची शिकार करतात. परंतु व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील व्यक्तीने एका मुक्या पिल्लाला त्याच्या आईला भेटवण्यासाठी त्याची मदत केली आहे. कोआलाला झाडावर चढण्यास मदत करणाऱ्या वन्यजीव छायाचित्रकाराचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हे ही वाचा : लिफ्टमधून कुत्र्याला नेणाऱ्या महिलेला माजी IAS ची मारहाण; नवऱ्याने घेतला बदला, घटनेचा VIDEO होतोय व्हायरल)

कोआला अस्वल एक ऑस्ट्रेलियन वृक्ष-निवास मार्सुपियल सस्तन प्राणी आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, कोआलाला आपल्या आईकडे जायचे आहे. पण त्याला झाडावर चढताच येईना, तो झाडावर चढण्याचा खूप प्रयत्न करतोय. पण त्याला चढण्यात यश मिळत नाही. शेवटी एक वन्यजीव छायाचित्रकार येतो त्याच्या एका हातात कॅमेरा असतो आणि तो कोआलाला दुसऱ्या हातात पकडून त्याच्या आईकडे सोपवतो. त्याची आई पटकन त्याला घट्ट पकडून मिठी मारताना दिसत आहे. छायाचित्रकार त्यांचा हा सुंदर दृष्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो. हे मनमोहक दृश्य इतर कोणीतरी रेकॉर्ड करुन सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडिओ

आता, हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक लोकं विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर X वर हजारो वेळा पाहिले गेले आहे. यावर उत्तर देताना X वापरकर्ते ‘हार्ट’ इमोजी शेअर करत कमेंट करत आहेत.