जिममध्ये जायची आपल्या सगळ्यांना जाम हौस. तिकडे व्यायाम करून , डंबेल्स उचलत, वजनं उचलत आपले हातापायचे मसल्स स्ट्राॅंग करायचे. जिमला जाणाऱ्या पोरांपैकी निम्म्याहून जास्त जणांना आपली हेल्थ चांगली व्हावी यापेक्षा ‘आपण दिसतो कसे’ या विचाराने जास्त पछाडलेले असतात. मग काय, जरा जिममध्ये जायचं, थोडे हातपाय इथेतिथे मारायचे, आणि टाऊमपास करत घरचा नाहीतर दारचा रस्ता पकडायचा असं ठरलेलं असतं. कुठल्याही जिममध्ये जा, असे नग खोऱ्याने सापडतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे लोक मग कोचचं एेकत नाहीत, वाॅर्मअप करत नाहीत, कूलडाऊन करत नाहीत. मग दुखापत झाल्यावरच अशा सगळ्यांना या गोष्टींची आठवण होते.

हे सगळं सांगायचं कारण असं की सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यायाम करणारा माणूस दिसतोय. एका वेट मशिनवर व्यायाम करत असताना त्याचा पाय चक्क तुटला! आता याने व्यायामापूर्वी वाॅर्मअप केलं होतं की नाही हे माहीत नाही. पण त्याला दुखापत झाली खरी. पटकन घाबरणाऱ्यांपैकी तुम्ही नसलात तर पाहा  हा व्हिडिओ.

 

 

सौजन्य – फेसबुक

जाम भयानक आहे अशी दुखापत होणं. चांगल्या हेल्थसाठी व्यायामाचा नाद ठेवणं वेगळं आणि असे हातपाय मोडणं वेगळं. या दुखापतीनंतर त्याला लगेचच प्रथमोपचार मिळाले खरे पण त्यानंतरही याला अनेक दिवस प्लॅस्टरमध्ये राहून काढावे लागणार आहेत दिसत आहे.

सौजन्य- फेसबुक

अशा दुखापती टाळायच्या असतील तर काळजीपूर्वक व्यायाम करणं आवश्यक आहे. यासाठी योग्य जिम जाॅईन करण्याची गरज आहे. तसंच तिथल्या कोचच्या ज्या सूचना आणि सल्ले असतील ते तंतोतंत पाळणं आवश्यक आहे. नाहीतर उगाच चांगल्या बाॅडीच्या मागे जाताना पायच हातात यायचा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral video leg snap in a gym guy breaks his leg in gym leg snap gym body building
First published on: 28-03-2017 at 15:14 IST