scorecardresearch

Video: बायको ३५ वेळा पळून गेली; २ लेकरांसह थंडीत उभा बाप, म्हणाला, “भीक द्या नाहीतर..”

Shocking Viral Video: पोलिसांनी तिला समजवून पुन्हा घरी पाठवलं त्याच वेळी त्यांना दुसरी मुलगी झाली. जिच्या जन्मानंतर १५ दिवसांनी या बाईने पोटच्या मुलीची हत्या केली…

Video: बायको ३५ वेळा पळून गेली; २ लेकरांसह थंडीत उभा बाप, म्हणाला, “भीक द्या नाहीतर..”
Video: बायको ३५ वेळा पळून गेली; २ लेकरांसह थंडीत उभा बाप, म्हणाला, "भीक द्या नाहीतर.." (फोटो: ट्विटर)

Shocking Husband Wife Fight Video: आई ही आई असते आणि ती आपल्याला बाळाला सोडून कधीच जाऊ शकत नाही, असा एक सर्वमान्य समज आहे. पण काही वेळा आईतील बाई जागी होऊन ती काहीही करू शकते. अशीच एक दन मुलांची आई आपल्या घरून तब्बल ४ वेळा पळून गेली आहे. बायकोच्या या पलायनाने मुलांचे वडील मात्र पुरते गोत्यात अडकले आहेत. याच त्रस्त बापमाणसाने अलीकडेच आपल्या मुलांच्या देखरेखीसाठी भीक मागण्याचा पर्याय निवडला आहे. बेरोजगार असल्याने त्याला मुलांची काळीज घेण्यापासून ते त्यांच्या पोटापाण्याची सोय करण्यापर्यंत सगळं काही स्वतःला करायला लागत आहे. बिहारमधील कैमूर या भागात अलीकडेच हा बाप आपल्या दोन लहान लेकरांना घेऊन हातात बॅनर धरून कडाक्याच्या थंडीत उभा होता.

या दोन लेकरांच्या बापाने हातात धरलेल्या या बॅनरवर लिहिले होते की, ” आपला देश स्वतंत्र आहे पण पुरुष स्वतंत्र नाही, आवड नाही गरज आहे मुलांचा सांभाळ करायचा आहे, तुम्हाला शक्य असेल तर काम द्या नाहीतर दान द्या”. कृष्णा मुरारी असे या व्यक्तीचे नाव असून त्याचा ४ वर्षाचा मुलगा अंश गुप्तता व ६ महिन्याची चिमुकली लेक खांद्याला बांधून तो मदत मागायला निघाला आहे. आता रस्त्यावर फिरून मुलांचं पोटाची सोय करण्यासाठी तो भीक मागत आहे.

कृष्णा मुरारी गुप्ता यांनी सांगितले की, तो मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याने लग्न केले त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला जो आता ४ वर्षाचा आहे. यानंतर त्यांचे भांडण झाल्याने त्याची बायको पळून गेली. पोलिसांनी तिला समजवून पुन्हा घरी पाठवलं त्याच वेळी त्यांना दुसरी मुलगी झाली. जिच्या जन्मानंतर १५ दिवसांनी या बाईने पोटच्या मुलीची हत्या केली. एकदा जेव्हा ४ वर्षाचा लेक बापाच्या बाजूला झोपला होता तेव्हा याच बाईने मुलालाही त्याला लोखंडाच्या रॉडने डोक्यावर मारलं आतापर्यंत ३० ते ३५ वेळा ती घरून पळून गेली आहे.

बायको ३५ वेळा पळून गेली, पहा बापाची आपबिती

हे ही वाचा<< Video:हिमंत की वेड? वाघाला खांद्यावर घेत ‘ती’ शौर्य दाखवायला गेली, त्याचं वजन इतकं जास्त की क्षणात..

कृष्णा मुरारी म्हणाले की, मी एकट्याने काम करून बाळांना सांभाळू शकत नाही म्हणून आता कामही सोडले आहे. दुसरीकडे पत्नीने कृष्णाच्या विरुद्ध हुंड्याची तक्रार केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 13:06 IST

संबंधित बातम्या