मुंबईतील मासे खाणाऱ्या लोकांसाठी खूशखबर आहे…खवय्यांना बाजारात न जाता थेट आपल्या घराजवळच्या पाण्यात जिवंत मासे मिळाल्यास? शहरात मासेमारी करण्याचा अनुभवही तुम्ही आता घेऊ शकता. आणि स्वतः पकडलेले मासे खाण्याचा आनंदही लुटू शकता. कल्पनेतील वाटणारी ही गोष्ट खरी ठरली आहे.
मुंबईतील कांदिवलीमध्ये नुकतीच अशा प्रकारची घटना घडली आहे. पावसाच्या पाण्यातून वाहत आलेल्या पाण्यात एका अन्नविक्रेत्याला फॅट फिश सापडले आहेत. हे मासे पकडतानाचे या व्यक्तीचे फोटो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे मासे पकडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. या शहरात आश्चर्यकारक अनेक घटना घडू शकतात, असे अनेकांनी त्यावर आपले मत नोंदवताना म्हटले आहे.
मुंबईच्या मुसळधार पावसाबाबत आपण अनेकदा ऐकतो. पण वेगाने येणाऱ्या या पावसाने आणि मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठते. मरीन लाईन्स, बांद्रा, लोअर परेल, सायन, घाटकोपर, अंधेरी, कांदिवली, बोरीवली, दहीसर या ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहते. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी कांदिवलीत साठले होते. याठिकाणी असणाऱ्या एका विक्रेत्याला या पाण्यात मासे दिसले आणि त्याने चक्क ते पकडलेही. पावसाच्या पाण्यात मासे पकडत असल्याचे पाहून या विक्रेत्याचा मित्रही धावत आला आणि त्याने हे मासे गोळा करण्यासाठी पिशवी पुढे केली.