scorecardresearch

Premium

भर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट

नवरदेवाने काय केलं असावं, याचा तुम्ही विचारही केला नसेल. नवरदेवाने जे काही केलं ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

viral news of rajashan bride ran away before marriage and groom waited 13 days
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या राजस्थानमधील एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवरी ही लग्नाच्या आधीच भर मांडवातून पळून गेली. त्यानंतर नवरदेवाने काय केलं असावं, याचा तुम्ही विचारही केला नसेल. नवरदेवाने जे काही केलं ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

हे प्रकरण राजस्थानमधील पाली येथील सैणा गावातील आहे. येथे एका लग्नात नवरी फरार झाली. नवरदेव मांडवात वरात घेऊन पोहचला. सर्व पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी पूर्ण केल्या. जेव्हा सकाळी फेरे घेण्याची वेळ आली तेव्हा तब्येत ठीक नसल्याचं कारण देत नवरी खोलीत गेली आणि मांडवातून पळाली. या संपूर्ण प्रकरणानंतर नवरदेवाने काय केले असावे, असा तुम्हाला प्रश्न पडेल पण घरी जाणार तर सोबत नवरीला घेऊनच जाणार, अशी नवरदेवाने अट ठेवली.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

हेही वाचा : Viral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ

या प्रकरणानंतर नवरीच्या कुटुंबातील लोकांनी मुलीचा शोध सुरू केला आणि तिला शोधून काढले आणि गुजरातमधून परत आणले. या दरम्यान नवरदेवाने १३ दिवस नवरीची वाट पाहिली. शेवटी नवरीच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले आणि नवरदेव तिला आपल्या घरी घेऊन गेला.

हेही वाचा : Viral Video : भर लग्नात नवरदेवाच्या समोर नवरीने गुटखा खाल्ला अन्…

सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. विशेष करून नवरदेवाचे कौतुक केले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 10:51 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×