सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चक्क नवरदेवाच्या समोर गुटखा खाताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची खूप चर्चा सुरू आहे.
हा व्हिडीओ राजस्थानच्या एका सामूहिक विवाह सोहळ्यातील आहे. येथे २६ मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात जवळपास २२२ जोडपी लग्नबंधनात अडकली. याच दरम्यान तेथील एका जोडप्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.




हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई? एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव हा फोनवर बोलत आहे तर नवरी ही नवरदेवाच्या समोर पॅकेट फोडून गुटखा तोंडात टाकते. हा व्हिडीओ कुणी तरी लपून रेकॉर्ड केला आहे, मात्र व्हिडीओ पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.