scorecardresearch

मुस्लीम जोडप्यांमध्ये वाढतोय ‘Unboxing By Husband’ चा ट्रेंड; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

या महिन्याच्या सुरुवातीपासून हा ट्रेंड समोर येऊ लागला असून मुस्लिम जोडप्यांमध्ये हा ट्रेंड बराच व्हायरल झाला आहे.

viral trend
नवविवाहित मुस्लिम जोडपी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री हा व्हिडीओ बनवून टिकटॉकवर पोस्ट करतात. (Photo : Twitter / @terp4ling)

मुस्लीम देश असणाऱ्या मलेशियामध्ये सध्या एक ट्रेंड बराच गाजतोय. हा ट्रेंड पाहून धार्मिक नेत्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी लगेच या ट्रेंडवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेंडचं नाव ‘अनबॉक्सिंग बाय हसबँड’ (Unboxing by Husband) असं आहे. या ट्रेंडमध्ये नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोला आरश्यासमोर उभं करून तिच्या डोक्यावरील दागिने काढतो. अगदी एखाद्या बॉक्सला उघडावे अशाप्रकारे हे केलं जातं यामुळेच याला ‘अनबॉक्सिंग बाय हसबँड’ असे नाव देण्यात आले आहे.

टिकटॉकवर पोस्ट करतात व्हिडीओ

या महिन्याच्या सुरुवातीपासून हा ट्रेंड समोर येऊ लागला असून मुस्लीम जोडप्यांमध्ये हा ट्रेंड बराच व्हायरल झाला आहे. नवविवाहित मुस्लीम जोडपी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री हा व्हिडीओ बनवून टिकटॉकवर पोस्ट करतात. यात नवरा आपल्या बायकोला आरश्यासमोर उभं करून तिच्या डोक्यावरील दागिने काढून बाजूला करतो. व्हायरल झालेल्या बहुतांश व्हिडीओमधील नववधूंच्या डोक्यावर हिजाब पाहण्यात आला आहे.

जाहिरातीत खराखुरा वाघ वापरल्याने Gucci ची झाली गोची; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

असे करणे धार्मिक मान्यतांच्या विरुद्ध

तथापि, हा ट्रेंड बंद करण्याची मागणीही केली जात आहे. ही प्रथा धार्मिक मान्यतांच्या विरुद्ध असून यावर बंदी आणायला हवी अशी मागणी अनेक धार्मिक नेत्यांकडून केली जात आहे. विरोध करणाऱ्या नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांचाही यात समावेश आहे. नुकतीच विवाहबंधनात अडकलेल्या इली अकिलाहने सांगितले, ‘मला टिकटॉक आवडत. मी या व्यासपीठाच्या माध्यमातून खूप काही शिकले आहे. परंतु मी या विचित्र ट्रेंडच्या विरोधात आहे. मी कधीही असे करणार नाही.’

स्वतःच्या सेल्फी विकून विद्यार्थ्याने कमावले ७ कोटी रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

मलेशियाच्या पश्चिमी तटावरील पर्लीस राज्यात राहणारे मुफ्ती डॉ. मोहम्मद असणारी जैनुल आबिदीन सुद्धा या ट्रेंडच्या विरोधात आहेत. त्यांनी म्हटलंय, ‘कॅमेरावर बायकोच्या डोक्यावरील दागिने हटवणे तिला विकण्याच्या सामान आहे.’ ‘मुस्लीम धर्मात अशा कृत्यांना परवानगी नाही. असे कोणी कसे करू शकतं? या ट्रेंडवर लवकरात लवकर बंदी आणावी.’ असे त्यांनी पुढे सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral trend unboxing by husband becoming popular among muslim couples pvp