पाकिस्तानी टीव्हीवर सुरू असलेल्या लाईव्ह शोमध्ये शोएब अख्तरचा अपमान करणाऱ्या टीव्ही अँकरने माफी मागितली आहे. टीव्ही अँकर नौमान नियाज यांनी आठवड्यापूर्वी थेट टीव्ही कार्यक्रमात शोएब अख्तरसोबत केलेल्या वागणुकीबद्दल “बिनशर्त” माफी मागितली आहे.अँकरने म्हटले की “मला अधिकार नव्हता. चूक करणे हे मानवीय आहे आणि त्यासाठी मी माफी मागतो. फक्त एकदा नाही तर लाखो वेळा. शोएब हा रॉकस्टार राहिला आहे. कॅमेऱ्यात जे काही घडले ते अशोभनीय होते.”

या प्रकरणी नौमान म्हणाले की, शोएबला त्याच्या विशेषतेच्या आधारावर आमच्याशी करारबद्ध केले गेले. लोकांना वाटले की मी फक्त एक होस्ट आहे, पण त्यांना माहित नाही की मी शोएबसह सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारावर सही करतो. तरीही ते चुकीचे होते, त्याचे समर्थन नाही.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

नक्की काय आहे प्रकरण?

या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पीटीव्हीचा राजीनामा दिला होता. २७ ऑक्टोबर रोजी पीटीव्ही स्पोर्ट्स कार्यक्रम “गेम ऑन है” च्या पॅनेलमध्ये दोघे सहभागी झाले होते. अख्तर आणि नौमान व्यतिरिक्त, वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स, इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गॉवर, पाकिस्तानची माजी महिला कर्णधार सना मीर आणि माजी वेगवान गोलंदाज उमर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे सर्वजण पाकिस्तान-न्यूझीलंड टी-२० विश्वचषक सामन्याची चर्चा करत होते. पाकिस्तानने हा सामना पाच विकेटने जिंकला.

( हे ही वाचा: Video : आता बैलाच्या डोक्यावरही QR Code! केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या…! )

पाकिस्तानी संघावरील चर्चेदरम्यान, अख्तरने शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांच्या शोधाचे श्रेय पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर कलंदर फ्रँचायझीला दिले. त्यानंतर नियाजने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो थांबला नाही तेव्हा त्याने शोएब अख्तरला सांगितले की, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ते सहन करणार नाही. तो म्हणाला- “तुम्ही जाऊ शकता. मी हे ऑन एअर सांगत आहे.”