Viral Video : उखाण्याचा अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाणे मजेशीर असतात तर काही उखाणे ऐकून थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण त्याच्या पत्नीसाठी सुंदर उखाणा घेताना दिसत आहे. हा तरुण क्रिकेटप्रेमी आहे त्यामुळे उखाण्यात सुद्धा तो क्रिकेटचा उल्लेख करताना विसरत नाही.

महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये उखाण्याला विशेष महत्त्व आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच आपण उखाणा म्हणतो. कोणत्याही शुभ प्रसंगी पती किंवा पत्नी त्यांच्या जोडीदाराचे नाव घेतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा एक तरुण उखाणा घेताना दिसतो. नुकतेच लग्न झालेल्या या जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जोडपं दिसेल. व्हिडीओत एक तरुण त्याच्या पत्नीचे नाव घेताना दिसतो. तो उखाणा घेताना म्हणतो, “अग्नीच्या साक्षीने घेतले सात फेरे, श्रुतिकाचा विश्वास कधीच नाही तोडणार.. आता नवीन संसार झाला सुरू, पण माझं क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाचा उखाणा ऐकून सर्व जण एकच जल्लोष करतात. नवरीसुद्धा त्याच्याकडे बघून हसते. हा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हा तरुण क्रिकेटप्रेमी असावा, असे वाटते. अनेकांना हा व्हिडीओ आवडू शकतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

sksagar3636 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा तुमचे तुमच्या आयुष्यातील प्रेमाबरोबर लग्न होते पण क्रिकेट हे तुमचे पहिले प्रेम आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बायको रॉक नवरा शॉक” तर एका युजरने लिहिलेय, “भाऊने थेट षटकार मारला” आणखी एका युजरने लिहिलेय, “माळवणी माणूस शेवटी” अनेकांना हा उखाण्याचा व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी हसण्याचे तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.