मैत्री ही प्रत्येकासाठीच एक खास गोष्ट आहे. आपला खास मित्र आपल्या सोबत असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. निस्वार्थ मैत्री मिळणे ही खूपच भाग्याची गोष्ट आहे. सोशल मीडियावर एका व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या खास मित्राला सरप्राईज देण्यासाठी कॅनडाहून आलो आहे. या व्हिडीओतील व्यक्तीची प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू येईल आणि आनंदही होईल.

आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो की ज्या मुलाचे लग्न आहे त्याचे डोळे बंद केलेले आहे. आधी एक मुलगी त्या मुलाचे शर्ट मागून नीट करत असते. त्याचवेळी त्याचा जिवलग मित्र मागून येऊन त्याचे डोळे बंद करतो. त्या व्यक्तीचे डोळे उघडताच तो आनंदाने उडी मारतो. व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या व्यक्तीच्या उत्साहाची कल्पना येईल. वराला इतका आनंद झाला की तो आपल्या मित्राच्या अंगावर उडी मारतो.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

अनेक सोशल मीडिया यूजर्स या क्षणाचा आनंद लुटताना दिसले. काही लोक म्हणाले, ‘व्वा, सरप्राईज असावे तर असे.’ एवढे मोठे सरप्राईज देऊन या मित्राने त्या व्यक्तीच्या खास दिवसाला अधिक खास बनवले. हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओला ७० हजारांहून अधिक लोकांनी लाईक देखील केले आहे. हा सुंदर व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या मैत्रीचे काही किस्सेही शेअर केले.