Viral Video: अनेक वाहनचालक त्यांची रिक्षा, बस, गाडी, बाईक, सायकल आदी वाहनांना खूप जपताना दिसून येतात. तसेच स्वतःचा आणि प्रवाशांचा प्रवास सोईस्कर व्हावा यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात. काही जण आपल्या वाहनांमध्ये छोटे छोटे पंखे लावतात, रेडिओ लावून प्रवाशांचा प्रवास मनोरंजक करतात;पण, आज सोशल मीडियावर असाच एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे एका रिक्षाचालकाने देशी जुगाड करून रिक्षात पाईप लावून घेतला आहे.

व्हायरल व्हिडीओत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे. या सर्व गाड्यांमध्ये एका रिक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कारण एका रिक्षा चालकाने त्यांच्या रिक्षाला एक पाईप लावून घेतला आहे. हा पाईप उष्णतेपासून सुटका करून घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. एकदा पाहाच रिक्षा चालकाचा हा जुगाड.

watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
a woman stole from a another woman purse now the video is going viral on social media
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
How To Save Electricity Bill Through Fridge
उन्हाळ्यात फ्रिजमुळे विजेचं बिल खूप येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, व्हिडिओ एकदा पाहाच

हेही वाचा…मधमाश्यांच्या पोळ्यातून कसा काढला जातो मध? VIDEO पाहून अंगावर येतील शहारे; म्हणाल, ‘मेहनत…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पाईपचा अर्धा भाग रिक्षाच्या आतमध्ये तर अर्धा भाग रिक्षाच्या बाहेरच्या साईडला आहे. पण, हा पाईप लावण्यामागचं कारण काय ? तर जेव्हा रिक्षा वेगात पुढे जाईल तेव्हा पाईपद्वारे दुसऱ्या बाजूने रिक्षाचालकापर्यंत हवा पोहोचेल व त्याला उष्णतेचा सामना करावा लागणार नाही. तर या दृष्टीकोनाने असा हा जुगाड शोधून काढण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूमधील आहे असे रिक्षाच्या नंबर प्लेटवरून दिसून येत आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sangeeeramez या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जसं एखादा रिक्षा चालक प्रवास थंडगावर व्हावा म्हणून पंखा, झाडे लावून घेतात अगदी त्याचप्रमाणे थोडा देशी जुगाड करून पाईप लावण्यात आला आहे ; जो सध्या अनेकांच लक्ष वेधून घेत आहे.