Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसविणारे, तर काही थक्क करणारे असतात. कधी मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंटचे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या विश्वात कुठे काय घडेल आणि कधी व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो एका ऑफिसमधील आहे.

ऑफिस म्हटलं की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख, तणाव पाहायला मिळतो. परंतु हल्ली अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी दररोज काही वेळ किंवा आठवड्यातील एखाद्या वाराला मनोरंजन करण्यासाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यात खेळ खेळले जातात, गाणी म्हटली जातात किंवा डान्स केला जातो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑफिसमध्ये सर्वांसमोर एक तरूण ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. त्याच्या अफलातून डान्स स्टेप्स अन् त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आसपास असलेले सर्वचजण अवाक् होतात. शिवाय या तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ram_official_0119 या अकाउन्टवर शेअर केला असून या व्हिडीओला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाईक्स मिळाल्या आहेत. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. एका युजरने लिहिले, “मला हे ऑफिस खूप आवडले. किती छान वातावरण आहे!” आणखी एकाने लिहिलेय की, “मलाही अशीच कामाची जागा हवी आहे.”, तर आणखीने एकाने लिहिलंय की, “भाऊ राडा केलास तू तर”