इंटरनेटवर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे नेहमीचं आपलं मनोरंजन करतात. तसेच तुम्ही चोरीचे देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये चोरटा जी चोरी करतोय, ते पाहून तुम्हीही म्हणाल, ही काय चोरी झाली? पण हा व्हिडीओ पाहून लोक आनंद घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मध्यरात्री एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला आपली स्कूटी थांबवताना दिसत आहे. त्यानंतर रस्त्यावर आधी आपल्या आजूबाजूला कोणी नाही ना, हे पाहतो. मग जाऊन गटाराचे कव्हर उचलतो. मग तो त्याच्या स्कूटीवर ड्रेन कव्हर ठेवतो, त्यावर बसतो आणि पळून जातो. हे पाहिल्यानंतर लोक सुरूवातीला आश्चर्य झाले, पण नंतर गटाराच्या ड्रेन कव्हरची चोरी झालेली पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीय. नेटिझन्सना हा व्हिडीओ फारच आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना अनेक इमोजींचा जणू काही महापूर आणलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पोलिसांना पाहून भाजी विक्रेत्याने हेल्मेट घातलं, पोलिसांनी पकडले तेव्हा म्हणाला….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भरधाव ट्रकने गेंडयाला धडक दिली, ट्रक चालक पसार, पाहा धक्कादायक घटनेचा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.